Sangram Jagtap : नगर : ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) हे समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला मोलाची दिशा दाखवते. आनंद ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी स्वच्छतेबाबत (Cleanliness) घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे, मत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी व्यक्त केले.
नक्की वाचा : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा
बुरुडगाव रोड भोसले आखाडा येथे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. लोकार्पण प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी शहर स्वच्छतेची शपथ घेत नगरकरांना स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छ-निरोगी शहर घडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रभाग क्रमांक १४ च्या विकासाचा आदर्श संपूर्ण शहरात उतरविण्यासाठी आपणा सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.
ज्येष्ठ नागरिकांनी मताद्वारे दिलेल्या आशीर्वादामुळे शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे सांगत त्यांनी आगामी दिवसात सीना नदीचे खोलीकरण सुरू होणार असल्याची माहिती दिली.यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, शहर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी उपसभापती मीना चोपडा, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विशाल पवार, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, ज्ञानदेव पांडुळे, संगीता भोसले, निर्मला बाफना, रूपाली बाफना, तात्या दरेकर, बाजीराव मुरकुटे, आर. डी. मंत्री, पोपट काळे, बी. एन. शिंदे, रणजीत पोखरणा, म्हातारदेव वायकर, रामदास वामन यांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन
माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, (Sangram Jagtap)
प्रभागातील ज्येष्ठ नागरिक पूर्वी रस्त्याच्या कडेला बसून एकत्र येत असत, त्यामुळे त्यांना स्वतःची हक्काची जागा मिळावी म्हणून आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर प्रभागात दोन भव्य ज्येष्ठ नागरिक भवनांची निर्मिती करण्यात आली. याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र इमारत व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय करण्यात आली असून विकासकामांसोबतच नागरिकांचे दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नैसर्गिक ओढे-नाले बुजवू नयेत यासाठी शासनाचा निधी थेट गल्ली स्तरापर्यंत पोहचविण्यात येत असून शहर विकासाचा दिलेला शब्द आपण पूर्ण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कै. रमेश बाफना यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी इमारत उभारण्याचा जो संकल्प केला होता, तो आज पूर्णत्वास गेला असून हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे ते म्हणाले.



