Sangram Jagtap : नगर : देशाला खरा धोका देशातील ‘त्या’ जिहादी (Jihadi) लोकांपासून आहे. ते आपल्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे दिल्ली येथील बॉम्बस्फोटातून (Delhi bomb blast) सिद्ध झाले आहे. सुशिक्षित जिहादी व्यक्ती देशाविरुद्ध कारवाई करत आहेत. त्यांना धडा शिकवण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले आहे.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
अहिल्यानगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे सोमवारी (ता.१५) अनावरण झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, गणेश कवडे, प्रा. माणिकराव विधाते, अजिंक्य बोरकर, निखिल वारे, सतीश बारस्कर, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, विपुल शेटिया, विकी जगताप, उद्योजक राजेश भंडारी, आशिष पोखरणा, सुरेश इथापे, केतन क्षीरसागर, अरविंद शिंदे, राजेंद्र ससे, गोरख दळवी, संगीता खरमाळे, रेश्मा आठरे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शहरामध्ये उभा रहावा यासाठी संघर्ष झाला. यामध्ये कै. कैलास गिरवले यांनी हा पुतळा उभा राहण्यासाठी सन २००७ महापालिकेमध्ये ठराव करून घेतला. आणि सर्वांच्या सहकार्यातून हा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. त्यामुळे आज नगरकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. इतिहास फक्त एवढाच लक्षात ठेवायचे की, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या लढाया फक्त मोगलांबरोबर झाल्या ह्या जिहादी आणि डॉबरमॅनच्या अवलादी आहेत. छावा चित्रपट आला तेव्हा काही लोक सांगत होते की, शेवट पहा, पण छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट पाहू नका, तुम्ही औरंग्याचा शेवट पहा, त्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिले नाही. तर इथेच त्याला गाडले आहे. आणि आज ‘त्या’ जिल्ह्याचे नाव देखील छत्रपती संभाजीनगर, असे ठेवले आहे. हे काम फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचाराचे लोकच करू शकतात. आज छत्रपती संभाजी महाराज नसले तरी त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत.



