Sangram Jagtap : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

Sangram Jagtap : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले - संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले - संग्राम जगताप
Sangram Jagtap : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले - संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : शहराच्या पर्यटन (Tourism) विकासाला चालना मिळावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भिस्तबाग महालाच्या (Bhistbag Mahal) सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन नगर शहराचे (Nagar City) पर्यटन केंद्र बनले जाईल. कुठलेही काम रातोरात होत नसते. त्यासाठी व्हिजन व नियोजन लागते. तिच मंडळी सकारात्मक काम करू शकतात. आरोप हा काम करणाऱ्या व्यक्तीवरच होत असतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा: पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका! नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी

रस्ते काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण

नगर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून जय भवानीनगर मधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीना चव्हाण, जयभवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष संपत बारस्कर, अरुण आहेर, अनिल देवकर, सिद्धार्थ काळे, विठठ्ल खेंडके, भाऊसाहेब पिसाळ आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sangram Jagtap : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले - संग्राम जगताप
Sangram Jagtap : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

आमदार जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)

पूर्वी तपोवन रस्त्यावरती राजकारण करत आपली राजकीय स्वार्थ साधला जात होता. मात्र, मी आमदार झाल्यानंतर तपोवन रस्ता हा फक्त नकाशावर होता. तो मी प्रत्यक्षात उतरविला असल्यामुळे या भागाच्या विस्तारीकरणाला चालना मिळाली आणि नागरिक आपल्या आपल्या घराची स्वप्न पूर्ण करू शकले आहे. पूर्वी कधीही काँक्रिटीकरणाची रस्ते पहावयास मिळत नव्हती. आता मात्र सर्वत्र दर्जेदार काँक्रिटीकरणाच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. पुढील एप्रिल महिन्यापर्यंत बहुतांश रस्त्याची कामे पूर्ण होतील. शहरातील बहुतांश कॉलनी अंतर्गत विकासाचे कामे पूर्ण झाली असल्यामुळे सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.