Sangram Jagtap : श्री विशाल गणपती मंदिरातून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

Sangram Jagtap : श्री विशाल गणपती मंदिरातून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

0

Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation Election) २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ माळीवाडा येथील श्री विशाल गणपती मंदिर येथे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार श्री. सुरेश लक्ष्मण बनसोडे (अ), सौ. सुजाता महेंद्र पडळे (ब), सौ. अनिता विपुल शेटिया (क) व श्री. अविनाश हरिभाऊ घुले (ड) यांच्यासह गोरख पडोळे, विपुल शेटीया, व्यापारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Sangram Jagtap : श्री विशाल गणपती मंदिरातून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा
Sangram Jagtap : श्री विशाल गणपती मंदिरातून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

गणपती बाप्पाच्या जयघोषात प्रचाराची सुरुवात

प्रचार शुभारंभप्रसंगी वातावरणात उत्साह संचारला होता. ढोल-ताशांच्या गजरात व गणपती बाप्पाच्या जयघोषात प्रचाराची सुरुवात करण्यात आली. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचा वाढता प्रतिसाद व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग १३ मध्ये महायुतीला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

आमदार संग्राम जगताप आपल्या भाषणात म्हणाले की, (Sangram Jagtap)

अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण व समतोल विकास करण्याचा ठाम निर्धार महायुतीचा आहे. राज्यात आमचे सरकार असून त्या माध्यमातून गल्लीबोळांपासून ते शहरातील प्रमुख रस्त्यांपर्यंत विकासकामे झपाट्याने सुरू आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली आहेत.

Sangram Jagtap : श्री विशाल गणपती मंदिरातून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा
Sangram Jagtap : श्री विशाल गणपती मंदिरातून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

ते पुढे म्हणाले की, या विकास प्रक्रियेत नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज प्रभागात जे विकासकामे सुरू आहेत, त्यामागे नगरसेवकांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. त्यांच्या कामांचा आलेख पाहता नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत महायुतीचे पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाची महायुती निश्चितपणे जिंकेल, असा ठाम विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

यावेळी उमेदवार श्री. अविनाश हरिभाऊ घुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत अनेक भरीव विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, नागरी सुविधा, मूलभूत सोयी-सुविधा या विकासकामांमुळे आम्ही थेट जनतेपर्यंत पोहोचू शकलो आहोत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जनतेने आजपर्यंत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. सध्या प्रभागातील जे काही विकासकामे प्रलंबित आहेत, तीही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील. महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.