
Sangram Jagtap : नगर : शहरातील युवकांना व खेळाडूंना तसेच क्रीडा क्षेत्राला (Sports Field) प्रोत्साहन मिळून विविध खेळ प्रकारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व साहित्य मिळावे या उद्देशाने आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी राज्य शासनाकडे (State Government) केलेल्या सततच्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे. शहरातील विविध प्रभागांमधील १७ ठिकाणी व्यायाम शाळा व ओपन जिम (Open Gym) उभारण्यासाठी राज्य शासनाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी सातारा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगर शहरात विविध भागांमध्ये या निधीमधून युवकांना व्यायामशाळा व विविध क्रीडा साहित्य उपलब्ध होऊन मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या समाजकल्याण विभागामार्फत या प्रस्तावास मंजूर मिळाली असून निधी उपलब्ध झाला आहे.

नक्की वाचा: सुदृढ शरीरातूनच उत्तम प्रशासन घडेल : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
येथे हाेणार बंदिस्त व्यायामशाळा
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर महापालिका हद्दीत मंजूर झालेल्या एक कोटी सातारा लाख निधीतून पुढील कामे करण्यात येणार आहेत. प्रभाग ४ मधील निलशंकर कॉलनी येथील येथे बंदिस्त व्यायामशाळा करणे. प्रभाग १ मधील कॉटेज कॉर्नर येथे बंदिस्त व्यायामशाळा करणे. प्रभाग १४ मधील जेष्ठ नागरीक हॉल आय टी आय कॉलेज येथे बंदिस्त व्यायामशाळा करणे. प्रभाग क्र.१२ मधील माळीवाडा येथील कपिलेश्वर तालीम येथे बंदिस्त व्यायामशाळा करणे. प्रभाग १२ जुनी वसंत टॉकीज रोड येथील हॉलमध्ये बंदिस्त व्यायामशाळा करणे.
हे देखील वाचा : जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम
येथे हाेणार खुल्या व्यायामशाळा (Sangram Jagtap)
प्रभाग १ मधील सप्तश्रृंगी मंदिर, पंचवटी नगर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग २ मधील जुना पिंपळगांव रोड शिवनगर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग ४ मधील प्रकाशपूर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग ५ दिनाभाऊ कुलकर्णी जॉगिंग ट्रॅक, सावेडी येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग मधील नागापूर येथील आदर्श नगर, श्रीराम मंदीर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे.
प्रभाग १२ मधील सथ्था कॉलनी, रेल्वे स्टेशन येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग १४ मधील समता कॉलनी येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग १५ मधील संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग १६ केडगाव गावठाण येथील योगेश क्षीरसागर घरासमोरील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. प्रभाग १७ मधील मोहिनी नगर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे व पोलिस मुख्यालय येथील येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा करणे. आदी कामांचा समावेश आहे.


