Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार – संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार - संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार - संग्राम जगताप
Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार - संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : नगर एमआयडीसी (MIDC) मधील कामगारांचा सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच एमआयडीसी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवा (City bus service) सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या (Central Govt) माध्यमातून लवकरच २० इलेक्ट्रिक बस नगर शहरांमध्ये धावणार आहेत. केडगाव येथे बस डेपोचे काम सुरू होणार आहे. मागील २५ वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुख सुविधा पासून काम करावे लागले आहे. बस सेवेच्या माध्यमातून महिला भगिनीचा सुरक्षित प्रवास होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार - संग्राम जगताप
Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार – संग्राम जगताप

अवश्य वाचा: भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा प्रारंभ

नगर एमआयडीसीतील श्री रेणुका माता मंदिर येथे नगर महापालिकेतर्फे एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी अमी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, माजी नगरसेवक सागर बोरुडे, जल अभियंता परिमल निकम, मिलिंद कुलकर्णी, शंतनू गाडे, संजय बंदिस्ती आदींसह नागरिक उपस्थित होते.

Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार - संग्राम जगताप
Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार – संग्राम जगताप

नक्की वाचा: पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका! नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी

मिलिंद कुलकर्णी म्हणाले की (Sangram Jagtap)

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच सर्वात सुरक्षित आहे. कामगार वर्ग आपल्या कामावर येत असताना अपघाताच्या अनुचित घटना घडल्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या कडे सिटी बस सेवेची मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावले. आमदार संग्राम जगताप हे शहराला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व मिळाले आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे आपले शहर पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले. उद्योजक राजेंद्र कटारिया यांनी कार्यक्रमाची प्रस्तविक केले. उद्योजक सचिन पाटक यांनी आभार मांडले.

Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार - संग्राम जगताप
Sangram Jagtap : नगर शहरांमध्ये लवकरच २० इलेक्ट्रिक बस धावणार – संग्राम जगताप