Sangram Jagtap:’ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही,त्यांनी कुस्तीवर बोलू नये’-संग्राम जगताप 

0
Sangram Jagtap:'ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही,त्यांनी कुस्तीवर बोलू नये'-संग्राम जगताप 
Sangram Jagtap:'ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही,त्यांनी कुस्तीवर बोलू नये'-संग्राम जगताप 

नगर : ‘ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही, त्यांनी कुस्तीवर बोलू नये’,असं म्हणत अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अहिल्यानगर येथे यंदाची ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला.मात्र,अंतिम सामन्यात पंचांकडून चुकीचा निर्णय झाल्याचे सांगत चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. याच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्र केसरी ही पैलवानासाठी होती की, राजकीय नेत्यांसाठी होती,असा सवाल उपस्थित करत स्पर्धेदरम्यान पैलवानांचा योग्य मानसन्मान झाला नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.रोहित पवारांच्या या टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

नक्की वाचा : बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? बदलापूर प्रकरणी हायकोर्टाचा सवाल

‘अजित दादांमुळे पडद्याआड घालतो पण याचा गैरफायदा घेऊ नये'(Sangram Jagtap)

संग्राम जगताप यावेळी म्हणाले की,आत्तापर्यंतच्या कुस्ती स्पर्धेत कोणी हभप महाराज नव्हते किंवा कोणी क्रिकेटमधील व्यक्ती नव्हते.सर्व राजकीय माणसांनीच ही कुस्ती स्पर्धा पुढे नेली. अलिकडच्या काळात नव्याने राजकारणात येणाऱ्यांना मी लगेचच महाराष्ट्रात पुढे गेलं पाहिजे,असं वाटतं म्हणून ते काहीही बोलतात.पण थोडा वेळ लागेल,गडबड न करता सगळं करावं. आम्ही अजित दादांमुळे पडद्याआड घालतो, त्यांचा मान-सन्मान राखला जातो,पण याचा कोणी गैरफायदा घेऊ नये,असंही संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकारचा मोठा निर्णय

काय म्हणाले होते रोहित पवार? (Sangram Jagtap)

अहिल्यानगर मधील महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन हे पैलवानांसाठी होते की, नेत्यांसाठी हेच कळत नव्हते. तिथे पैलवान कमी,पंच कमी आणि नेतेच जास्त होते. ती कुस्ती कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी घेतली होती का काय हे कळत नव्हते. जो निकाल लागला यामध्ये सुद्धा पैलवानावर अन्याय झाला, हे सगळं योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी, अशी मी विनंती केली आहे. कुठल्याही पैलवानाला जिंकवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेणार नाही.जर ही गोष्ट मान्य केली तर खरी महाराष्ट्र केसरी मार्च अखेर आपल्याला बघायला मिळेल,असं रोहित पवारांना म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here