Sanjay Bansode : नगर जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : मंत्री बनसोडे

Sanjay Bansode : नगर जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : मंत्री बनसोडे

0
Sanjay Bansode : नगर जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : मंत्री बनसोडे
Sanjay Bansode : नगर जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : मंत्री बनसोडे

Sanjay Bansode : नगर : नगर जिल्ह्यात क्रीडा विकासासाठी आवश्यक असलेल्या नवीन क्रीडा संकुलांच्या (Sports complex) कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री (Ministry of Youth Affairs and Sports) संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी दिली.

नांदुर्खी ब्रुदूक येथील राहाता तालुका क्रीडा संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडामंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नांदुर्खीचे सरपंच माधवराव चौधरी आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार    

क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले,

”महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली. मिशन लक्षवेध योजनेद्वारे महाराष्ट्रातून ऑलिंपिक खेळाडू तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. एशियन व ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत भरघोस वाढ करण्यात आली. २०१८ पासून नियुक्ती अभावी प्रलंबित २०० खेळाडूंना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या. ”

अवश्य वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

‘वाडियापार्क’ संकुल विकसित करण्यासाठी प्राधान्य (Sanjay Bansode)

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, ”शासनाच्या क्रीडा विभागाचे विविध योजनांच्या माध्यमातून गतीने काम सुरू आहे. ‘खेलो इंडिया’ उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने देशाच्या क्रीडा विकासाला चालना मिळाली आहे. नगर शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे. यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यासाठी शासनास्तरावरून क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.”

असे आहे क्रीडा संकुल

पाच एकर जागेत साकारण्यात आलेल्या या राहाता तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामास ४ कोटी १८ लाख रूपये खर्च झाला आहे. या क्रीडा संकुलामध्ये ४०० मीटर धावपट्टी, बॅडमिंटनचे इनडोअर दोन कोट, संरक्षण भिंत, त्याचबरोबर इतर क्रीडा सुविधा आहेत.