
Sanjay Dhopavkar : नगर : क्रीडा क्षेत्रासाठी (Sports Sector) काम करीत असताना पदके व नोकरी मिळाली तर एवढ्यावर न थांबता निस्वार्थ व समर्पण भावनेने क्रीडा क्षेत्रात नवीन पिढी घडविण्यासाठी मोठ्या जिद्दीने काम करणारे प्रा.संजय धोपावकर यांच्या सारखी माणसे पुढच्या पिढीत मिळतील का? प्रा.संजय धोपावकर (Sanjay Dhopavkar) यांचा आदर्श घेऊन नवीन पिढी घडावी. क्रीडा क्षेत्रातील गुरूंचा सन्मान करणारा हा कार्यक्रम शहराला दिशा देणारा आहे. प्रा.संजय धोपावकर यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख क्रीडाधार या स्मरणिकेत केलेला आहे. क्रीडा क्षेत्रातील धारेप्रमाणेच प्रा. धोपावकर यांचे कर्तुत्व शब्दात व्यक्त न करता येणारे असेच आहे. निस्वार्थ व समर्पण भावनेने क्रीडा क्षेत्रात नवीन पिढी घडविण्याचे प्रा.संजय धोपावकर यांचे भरीव योगदान आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले आहे.
नक्की वाचा: सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
क्रीडारसिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित
सावेडी येथील माऊली सभागृह येथे प्रा.संजय धोपावकर यांचा सेवापूर्ती समारंभानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. तसेच श्री.धोपावकर यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख असलेली “क्रीडाधार” या स्मरणीकेचे प्रकाशन करताना आमदार संग्राम जगताप, आनंद लिमये (माजी अप्पर मुख्य सचिव गृहविभाग, सदस्य महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई), सौ.धनश्रीताई विखे पाटील, सौ.पद्मजा धोपावकर, महापौर सौ.ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, हिंद सेवा मंडळाचे संचालक सुमतीलाल कोठारी, उद्योगपती राजेंद्र चोपडा, धनंजय धोपावकर, विजय धोपावकर, अजय धोपावकर, अमोल धोपावकर, आदित्य धोपावकर, प्रा.संजय साठे आदींसह समस्त क्रीडारसिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
आनंद लिमये म्हणाले, (Sanjay Dhopavkar)
प्रा.संजय धोपावकर यांच्या सेवानिवृत्ती व सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचा मला मान मिळाला याचा मला आनंद होत आहे. श्री. धोपावकर यांनी क्रीडा क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून कधीच बघितले नाही तर व्रतस्थ राहून क्रिडा क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे. खऱ्या अर्थाने शासन दरबारी त्यांचा बहुमान होऊ शकला नाही. परंतु त्यापेक्षाही मोठा सत्कार आज शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व क्रीडा प्रेमींनी केलेला सत्कार आहे. कृतज्ञतेची खरी पावती म्हणून शासन दरबारी श्री.धोपावकर यांचा सन्मान व्हावा. यासाठी अहिल्यानगर येथील सर्व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रयत्न करावेत.
धनश्रीताई विखे म्हणाले, अहिल्यानगरच्या खेळाडूंना मोठे मोठे पुरस्कार मिळवून देण्याचे काम प्रा.संजय धोपावकर यांनी केले आहे.सध्या खेळाला पालकांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याने अभ्यासा बरोबरच खेळ तेवढाच महत्त्वाचा आहे.या पुढील काळातही नगरच्या खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी मार्गदर्शन करावे.
आनंद भंडारी म्हणाले, प्रा. संजय धोपावकर यांनी क्रीडा क्षेत्रात हजारो खेळाडूंना घडवून मोलाचे योगदान दिले आहे. शहराच्या क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी योगदान द्यावे. यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करू.
धनंजय जाधव म्हणाले, श्री शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू घडविणारे प्राध्यापक संजय धोपावकर यांना अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू. सेवानिवृत्तीनंतर प्रा. संजय धोपावकर यांनी महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाची धुरा सांभाळावी.
सचिन जगताप म्हणाले, श्री धोपावकर यांचे सारखे गुरु लाभले असताना 13 शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अहिल्यानगर शहरात घडले आहेत.ज्याप्रमाणे पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात त्याप्रमाणे
क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन अहिल्यानगर ला खेळाचे माहेरघर करण्यासाठी एकत्रित येऊन पाऊल उचलावे.
यावेळी राजेंद्र चोपडा सुमतीलाल कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनेक श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते, नवोदित खेळाडू, शहरातील क्रीडा रसिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडाधार संपादक असिम शेख यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. तर आभार ऐश्वर्या कुलकर्णी यांनी मानले.
प्रा.संजय धोपावकर म्हणाले, या कार्यक्रमात आयुष्यभर पुरेल एवढे कौतुक केलेले आहे. अहिल्यानगरच्या क्रीडाप्रेमींनी क्रीडाधार या स्मरणिकेची अमूल्य भेट दिली आहे. क्रीडाधार ही खेळाडूंची संपत्ती आहे. त्यामुळे मला श्रीमंत झाल्यासारखे वाटत आहे. क्रीडा क्षेत्रात काम करीत असताना माजी उपनगराध्यक्ष स्व.कृष्णा भाऊ जाधव व माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांनी खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे.
तसेच हिंद सेवा मंडळाने व सारडा महाविद्यालयाने क्रीडा संचालक म्हणून काम करीत असताना वेळोवेळी आमच्या मागण्या मान्य करून खेळाडूंना स्कॉलरशिप, ट्रॅक सूट, रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रात काम करीत असताना आत्तापर्यंत तेरा श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. यापैकी सहा खेळाडू ज्यूदो या खेळातील आहेत. क्रीडा क्षेत्रात चांगले काम करू शकलो यासाठी मला माझ्या परिवाराचा,सहकाऱ्यांच्या व पालकांचा पाठिंबा मिळाला आहे.


