Sanjay Kalamkar | गुंडेगावच्या कासारमळा शाळेत विद्यार्थ्यांचा रंगला डॉ.संजय कळमकरांशी दिलखुलास संवाद

0
Sanjay Kalamkar
Sanjay Kalamkar

Sanjay Kalamkar | नगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा तपासणी दरम्यान शाळेतील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी केंद्रप्रमुख असलेल्या साहित्यिक डॉ.संजय कळमकर (Sanjay Kalamkar)  यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी विद्यार्थ्यांनीच त्यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीतून एका विनोदी साहित्यिकाचा जीवन प्रवास उलगडला गेला.

हेही वाचा – राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर; राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण विभाग

आगळा वेगळा उपक्रम (Sanjay Kalamkar)

नगर तालुक्यातील गुंडेगाव केंद्रातील कासारमळा प्राथमिक शाळेत हा आगळा वेगळा उपक्रम पार पडला. मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाच्या शाळांच्या वार्षिक तपासणी अंतर्गत शाळा भेटी चालू आहेत. नगर तालुक्यातील गुंडेगाव केंद्रातील तुकाईमळा, कुताळमळा, मानेमळा व कासारमळा या शाळांची केंद्रप्रमुख डॉ.संजय कळमकर यांनी तपासणी केली. शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व निसर्गरम्य परिसर पाहून डॉ.संजय कळमकर यांनी समाधान व्यक्त केले. कासार मळा शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ.कळमकर यांची प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.

अवश्य वाचा – अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद

डॉ. कळमकरांचा जीवनपट जाणून घेतला (Sanjay Kalamkar)

या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून विनोदी साहित्यिक असलेल्या डॉ. कळमकर यांचा जीवनपट जाणून घेतला. आवडता छंद, भविष्यातील वेध, बालपण, आवडीनिवडी यांवर छान प्रश्नोत्तरे झाली..विविध पुस्तके, लेखक, कादंबरी यांची विद्यार्थ्यांना छान माहिती मिळाली. हसा,खेळा पण अभ्यासही करा हा संदेश डॉ. कळमकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. लहान मुलेही उत्कृष्ट मुलाखत घेतात याचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविक शिक्षक ईश्वर नागवडे यांनी केले तर शुभांगी मोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here