Sanjay Raut | महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत  

0
Sanjay Raut :'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा'- संजय राऊत
Sanjay Raut :'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा'- संजय राऊत

Sanjay Raut | श्रीगोंदा : महाराष्ट्राची खोटे बोलण्याची परंपरा नाही महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या स्वाभिमानाची परंपरा आहे. महाराष्ट्र हा कुणापुढे झुकणार नाही, लाचार होणार नाही, असे शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीगोंद्यात सांगितले.

नक्की वाचा: देशात मुसळधार पावसाच्या सरी बरसणार; ‘या’राज्यात अधिक पावसाचा अंदाज

संपर्क कार्यालयाचे उद्घाटन (Sanjay Raut)

शिवसेना उपनेते साजन पाचपुते याच्या श्रीगोंदा शहरातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शनिवारी (ता. १३) झाले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले होते.

अवश्य वाचा: गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा!

महाविकास आघाडीचे सरकार येणार (Sanjay Raut)

ते म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेच्या महाविकास आघाडीला दहा जागासुध्दा मिळणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी सांगत असताना कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यांनाच अवघ्या १० जागावर समाधान मानावे लागले असून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे, याचे भान दिल्लीतील गुजरातच्या नेत्यांनी ठेवावे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून याबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.  

ते पुढे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी येथ उद्योग- धंदे गुजरातला पळविले आहेत. महाराष्ट्र राज्य हे शेतकरी, कष्टकरी कामगारांचे राज्य आहे व्यापाऱ्यांचे नाही मोदी शहा महाराष्ट्राला पायदळी तुडवू शकत नाहीत. निवडणुकीत कितीही पैश्याचा पाऊस पडला तरीही सत्ता मिळणार नाही.

शेती उत्पादनांना नव्हे तर आमदार ठेकेदारांना भाव (Sanjay Raut)

गद्दार आमदारांना ५० खोके देऊन सरकार आणले तर काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका मत २५ कोटीला विकत घेतले नगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीत साखर सम्राट वसूल मंत्री यांनी कोट्यवधी रुपयांची उधळण केली तरीही पराभवच त्याच्या वाटी आला व साधा शिवसैनिक निलेश लंके खासदार झाला. नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व आमदार निवडणून येणार असून नगर जिल्ह्याला जास्तीत जास्त मंत्रिपदे देऊन न्याय देण्याचे काम आघाडीच्या वतीने करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कांद्याला, दुधाला बाजार नाही कारण हे सरकार कांदा अफगाणिस्तान मधून आयात करून शेतकऱ्याची चेष्ठा केली करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतायत हे पाहावे लागेल. दुधाला भाव नाही मात्र, ५० खोके घेणाऱ्या आमदारांना, १० टक्के देणाऱ्या ठेकेदारांना भाव आहे मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांबाबत खंत व्यक्त केली.


शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी सांगितले की, मी सदाशिव पाचपुते यांचा मुलगा आहे. मला पैसे संपत्ती कमवायची नाही. जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे सर्व सामन्याचे प्रश्न सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय सुरु केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पुण्याचे वसंत मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले,  बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार याची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख विजय शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला आमदार सुनील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, राजेंद्र भगत, शरद झोडगे, जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here