Sanjay Raut : नगर : शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर केलेल्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. “केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असल्या विचाराची माणसं आमच्यातून निघून गेली, हे बरंच झालं” असेही संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा: शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल
राऊतांनी सवाल केला उपस्थित
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले. वाऱ्यामुळे पुतळा पडला असेल तर मग आजुबाजूच्या घरांवरील पत्रे का उडाले नाहीत?, आजूबाजूची झाड का पडली नाही? असा सवालही उपस्थित केला.
अवश्य वाचा: ‘आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख
फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर टीका (Sanjay Raut)
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यामधून काही चांगलं होईल, असे दीपक केसरकरांना वाटते. हे शब्द केसरकरांच्या तोंडातून कसे निघू शकतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेत. मिंधे यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले आहे. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाल्ल्यामुळे पडला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.