Sanjay Raut : संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार

Sanjay Raut : संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार

0
Sanjay Raut : संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार
Sanjay Raut : संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार

Sanjay Raut : नगर : माजी आमदार राहुल जगताप यांना तिकीट देऊन महाविकास आघाडीचे ही जागा वाया कशाला घालायची? अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्या आमदार म्हणून निवडून जाणार. आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) त्यांच्याकडे ४० वर्षे सत्ता होती. एकदा फक्त अनुराधा नागवडे यांना संधी द्या, तुम्हाला तालुक्याचा आमदार कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ, अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर जोरदार टीका केली.

नक्की वाचा: ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे

अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी श्रीगोंद्यात सभा

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी आज संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब भोस, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.

Sanjay Raut : संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार
Sanjay Raut : संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार

अवश्य वाचा: ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संजय राऊत म्हणाले की, (Sanjay Raut)

पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या व्यापाऱ्याने राज्यात घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना फोडली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन पक्ष केले. लोकसभेमध्ये ४०० पारचा नारा देणाऱ्या महायुतीला ब्रेक लावण्याचे काम हे महाराष्ट्राने करून दाखवले. आता आपल्याला विधानसभा जिंकायची आहे. श्रीगोंद्यामध्ये मशाल पेटली म्हणजे. महाराष्ट्र आपल्या १७० जागा निवडून येतील. २३ तारखेला हीच मशाल मातोश्री वर येणार. समोरच्या उमेदवाराला स्वतः एक रास्ता करता आला नाही. त्यांची आज निशाणी रोडरोलर आहे, अशा शब्दात राऊत यांनी राहुल जगताप यांच्यावर टीकेची तोफ डागली.

ते पुढे म्हणाले की, आम्ही राहुल जगताप यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी ऐकले नाही. तुम्ही स्वार्थासाठी शरद पवारांचं नाव घेतात स्वतःचे कारखाने वाचवण्यासाठी विरोधकांकडून पैसे आणतात आणि आमच्यावरच आरोप करतात. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही भांडण नाही. या पुढे २५ वर्षांत महाविकात आघाडीला कोणीही हरवू शकत नाही. काही जरी झाले तरी या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.