Sanjay Raut : मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर लढणार : संजय राऊत

Sanjay Raut : मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर लढणार : संजय राऊत

0
Sanjay Raut : मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर लढणार : संजय राऊत
Sanjay Raut : मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर लढणार : संजय राऊत

Sanjay Raut : नगर : लोकसभेच्या (Lok Sabha Elections) मोठ्या यशानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रचंड आत्मविश्वास वाढला होता. पण विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) त्यांचे पूर्ण पानिपत झाले होते. यामध्ये युतीमधील पक्षांनी प्रचंड बहुमत मिळवले. आता या निवडणुकीतील पराभवावर दोन महिन्यानंतरही महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षासाठी महत्वाची असलेली मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी या हेतून स्वबळावर लढणार असल्याचे उबाठाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केले आहे.

Sanjay Raut : मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर लढणार : संजय राऊत
Sanjay Raut : मुंबई पासून नागपूर पर्यंत स्वबळावर लढणार : संजय राऊत

नक्की वाचा : ‘विधानसभेला ते तिन्ही पक्ष स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू,चिंता नाही’-राधाकृष्ण विखे पाटील

माधम्यांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की,

“जागावाटपात बराच उशीर झाल्यानं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते. जागावाटपात झालेल्या घोळाला काँग्रेस नेते नाना पटोले, शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत जबाबदार असल्याचा त्यांचा रोख होता. ‘वडेट्टीवार आता बोलत आहेत. जागावाटपाच्या बैठकांना तेपण उपस्थित असायचे. शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे. आमच्यावर टीका होतेय. पण हरियाणात काँग्रेससोबत कोण होतं? तिकडे ते एकटेच होते. जागावाटपाचा घोळ नव्हता. मग तिकडे त्यांचा पराभव का झाला?,” असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.

अवश्य वाचा : मोठी बातमी!पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू

एकदा आम्हाला स्वबळ आजमवायचं आहे (Sanjay Raut)

आम्ही ‘मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला स्वबळ आजमवायचं आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्बळावर लढवणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मला तसे संकेत दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर महापालिकेत आम्ही स्वबळावर लढू. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हा परिषदा, ग्राम पंयाचयीच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि आपालले पक्ष मजबूत करणार आहोत,’ अशी घोषणा राऊत यांनी केली.