Sanjay Raut : आमदार धस यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर… संजय राऊतांची जोरदार टीका

Sanjay Raut : आमदार धस यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर… संजय राऊतांची जोरदार टीका

0
Sanjay Raut : आमदार धस यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर… संजय राऊतांची जोरदार टीका
Sanjay Raut : आमदार धस यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर… संजय राऊतांची जोरदार टीका

Sanjay Raut : अहिल्यानगर : राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरले आहे. यामध्ये त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांना कात्रीत पकडले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराडविरोधात पुरावे आणि नवनवीन आरोप केल्याने आमदार धस चर्चेत आले होते. मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे दोघांमध्ये समेट झाला का? असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धस यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.

नक्की वाचा : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका

खासदार संजय राऊत म्हणाले की,

बीडमधील एका प्रमुख नेत्याने मला आधीच सांगितलं होतं सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवू नका. धस हे कधीही पलटी मारतील. देशमुख कुटुंबासाठी लढा देतील आणि न्याय देतील, मला तेव्हा लोकांनी समजावलं तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्देवाने हे सत्य होताना दिसतंय, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा : परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडला (Sanjay Raut)

मला वाईट वाटतंय एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. लहान मुलं त्यांच्या मागे धावत होती कारण हा माणूस आपल्याला न्याय देईल. जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर देव, इतिहास त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा करत त्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर त्यांना फक्त बीडचीच नाहीतर राज्याची जनता हे लक्षात ठेवेल. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही. जर धसांनी असं काही केलं असेल तर विश्वासघातापेक्षा पुढचं पाऊल आहे. पण मला अपेक्षा आहे की धस असं कोणतंही कृत्य करणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी धसांवर निशाणा साधला.