नगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Pm Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पोलीस प्रशासनाने काल (ता.१७) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानावर तब्बल नऊ दिवसांनी नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा : चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी;सरकारकडून नवा आदेश जारी
संजय राऊत यांचं नगरमधील सभेत मोदींबद्दल वादग्रस्त विधान (Sanjay Raut)
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी संजय राऊत राज्यभर सभा घेत आहेत. नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी त्यांनी ८ मे रोजी नगरमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असे वक्तव्य केले होते.
अवश्य वाचा : टी-२० वर्ल्ड कप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Sanjay Raut)
यावेळी एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण ? असा पंतप्रधानांचा एकेरी उल्लेखही त्यांनी केला होता. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि कलम १७१ (क) ५०६ आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १२३ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.