Sanjay Raut:’भाजप बहुमतासाठी शिंदे,अजित पवारांचा पक्ष देखील फोडेल’ – संजय राऊत

0
Sanjay Raut:'भाजप बहुमतासाठी शिंदे,अजित पवारांचा पक्ष देखील फोडेल' - संजय राऊत
Sanjay Raut:'भाजप बहुमतासाठी शिंदे,अजित पवारांचा पक्ष देखील फोडेल' - संजय राऊत

नगर : “भाजपकडे बहुमत आहे आणि जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर ते बहुमत कसं मिळवायचं यामध्ये ते माहिर आहेत.बहुमतासाठी भाजप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांचा (Ajit Pawar) पक्ष देखील तोडू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री हे भाजपचेच व्हायला पाहिजे” असं मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा : ‘खाशाबा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स
“एकनाथ शिंदे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असे आम्ही मानतो, जरी ते घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत, ते आता नव्याने निवडून आले आहेत ते आणि त्यांची लोकं. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील. पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत. आता नवीन निवडणूक झाली आहे. त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणीही असेल तो लोकशाही आणि घटने नुसार बसेल” असं संजय राऊत म्हणालेत.

अवश्य वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य

…तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल (Sanjay Raut)

“२०१९ साली अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला आम्ही सांगत होतो, तेव्हा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. तेव्हा अडीच वर्ष फॉर्मुला मान्य केला असता तेव्हा पुढल्या अनेक घडामोडी टाळता आल्या असत्या. पण फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता. पक्ष फोडायचा होता म्हणून हा तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला  पाळला नाही आणि आता ते सर्व काही करायला तयार आहेत, यातून लक्षात घ्या महाराष्ट्रात शिवसेनेविषयी किती द्वेष आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेचा हक्क’ (Sanjay Raut)

“आज संध्याकाळी पर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतो. जनतेला अपेक्षा नाही पण आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं. ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी ठरवतील. ते काही इकडे आमदार ठरवणार नाहीत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच बहुमत आहे. त्यांच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा सरकार स्थापनेचा हक्क आहे” असं संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here