Sanjay Raut : काँग्रेस नेत्यांनी (Congress Leaders) मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये,अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं धक्कादायक विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील,असंही राऊत म्हणाले.
नक्की वाचा : मोठी बातमी!राज्यात दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार
‘जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिली जाईल’ (Sanjay Raut )
महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिली जाईल,असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल,वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : ‘धर्माचं भांडवल करु नका’,इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी
‘मोदी येतात मोदी जातात,कसलं उद्घाटन करतात,त्यांनांच माहिती नसतं‘ (Sanjay Raut )
आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली. मोदी येतात, मोदी जातात. ते कसलं उद्घाटन करतात, त्यांनाच माहिती नसतं,असा टोला राऊतांनी लगावला. उद्योगांचं काय ? आजही इथले उद्योग गुजरातला जात आहेत. जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय. मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या असे राऊत म्हणाले. बदलापूर प्रकरणाताल आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम मुख्यमंत्री करतायेत. कारण ते त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातील लोक आहेत असंही राऊत म्हणालेत.