नगर : ‘ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गोल्ड मेडल मिळेल’, असा खोचक टोला ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींना लगावला. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजीनगर च्या जागेवरुन महायुतीवर जोरदार प्रहार केला.
नक्की वाचा : दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएलमध्ये दुसरा विजय;जेक फ्रेझर मॅकगर्क ठरला गेमचेंजर
‘एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान’- संजय राऊत (Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले, तुम्ही म्हणत आहात की, ३७० हटवले. तर काश्मिरी पंडितांची घरवापसी झाली पाहिजे. मोदींना काश्मिरी पंडिताच दुःख समजून घेणे गरजेचे वाटले नाही. त्यांनी दुःख समजून घेतले नाही. एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे. ते फेकू चॅम्पियन आहेत. राष्ट्रीय स्तरावर फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी आणि अंपायर म्हणून शहांना घ्यावं लागेल, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
अवश्य वाचा : ‘रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे
मोदींचा चेहरा म्हणजे भुताटकी – संजय राऊत (Sanjay Raut)
देवेंद्र फडणवीस सांगतात, आमच्याकडे मोदी सारखा चेहरा आहे. तो एवढा भयंकर चेहरा आहे की, लोक घाबरायला लागलेत. जसे शोले मध्ये बच्चा सोजा वरणा गब्बर आ जायेगा, असा डायलॉग आहे. तसेच मोदींचं आहे. कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील. याला भुताटकी चेहरा म्हणतात. आता हा चेहरा लोकांना नको आहे. इतकी भयंकर अवस्था या लोकांनी केली आहे. ४०० पार जायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? जनता ठरवेल मोदी ठरवू शकत नाही. मोदींनी २००जिंकल्या तरी खूप झाल्या. मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असंही संजय राऊत या वेळी बोलताना म्हणाले.