नगर : आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) बेछूट आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर (Nitesh Rane) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडाडून प्रहार केला. यावेळी संजय राऊत म्हणाले,नारायण राणेंचा मुलगा आहे ना त्याला टिल्ल्या म्हणतात, नेपाळ्यासारखा बडबडत असतो. मला त्याचं नाव माहीत नाही, त्यानं नाक घासून माफी मागितली पाहिजे. फडणवीस आणि शिंदे यांनीही माफी मागितली पाहिजे,अशी मागणी राऊत यांनी केली. आदित्य ठाकरेंना निर्दोष असतानाही अडकवण्याचा प्रयत्न झाला, असं संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा : महाराष्ट्रभर घुमतोय अहिल्यानगरमधील टाळांचा नाद!
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चीट (Sanjay Raut)
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली आहे. चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा ९ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआयकडून करावी,अशी मागणी त्यांनी केली होती. आता महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, दिशा सालियन च्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही. तसेच,आदित्य ठाकरे देखील निर्दोष आहेत.
अवश्य वाचा : बंगळूरू चेंगराचेंगरी प्रकरणी RCB दोषी ;केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाची माहिती