Sanjay Raut:’फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानावं’-संजय राऊत  

0
Sanjay Raut:'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानावं'-संजय राऊत  
Sanjay Raut:'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानावं'-संजय राऊत  

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी,अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या तिरंगा यात्रेवरून केली आहे. तर आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा,असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही निशाणा साधला आहे.  

नक्की वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

संजय राऊत नेमकं काय म्हणाले ? (Sanjay Raut)

संजय राऊत पुढे म्हणाले की, तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय ? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का ? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला. या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे,अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

अवश्य वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद;महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश  

टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा

संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. त्यांना कळतं का ? युद्धबंदी, शस्त्रसंधी काय असते? आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवण्या इतकं सोपं आहे का ? ते निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेण्याइतकं सोपं नाही. युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र राहायला, त्यांना भारताची मदत हवी होती, तेवढी सुद्धा तुम्ही केली नाही. मिस्टर मोदी आणि अमित शाह तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल,असेही त्यांनी म्हटले आहे.