Sanjay Raut: ‘राज्यातील सध्याचे सरकार हे बैलपुत्र आहे. त्यांचा बाप बैल आहे. त्यामुळे या सरकारची बुद्धीही बैलाची आहे’,अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल (ता.३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले. यात देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” (Rajyamata Gomata) म्हणून घोषीत करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
नक्की वाचा : मोठी बातमी!अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच गोहत्या (Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सध्या काहीही काम उरलेले नाही. त्यामुळे ते असे निर्णय घेत आहे. आम्ही देखील गोमातेला मानतो. ते आम्हाला सांगायची गरज नाही. मात्र याच गोमातेच्या कत्ली ज्या होत आहेत, त्यात अनेक ठिकाणी जिथे भाजपची सत्ता आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश इथे हे प्रकार होत असताना यावर नियंत्रण कोण करणार,गोमाता राज्यमाता करून तुम्ही गोमातेचे संरक्षण कसे कराल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
‘सावरकर आज जर असते तर सरकारच्या कानात मारली असती’ (Sanjay Raut)
दिल्लीतून काही बैल राज्यात येतात आणि हे केंद्रातील लोक येथे फिरत आहे.आम्ही देखील गायींची पूजा करतो. त्यासाठी अध्यादेश काढायची काय गरज? देश कुठे घेऊन जात आहे. तुम्ही वीर सावरकरांना तर मानता ना? तर गोमातेबाबत त्यांची जी भूमिका होती ती समजून घेतली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जी भूमिका मांडली ती जर भाजपला मान्य असेल तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घ्यावे,अन्यथा घेऊ नये. सावरकर आज जर असते तर कालच्या निर्णयानंतर सरकारच्या एक कानात मारली असती, असं यावेळी संजय राऊत म्हणालेत.