Sanjay Raut:’एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देणे हा पवारांचाच अपमान’-संजय राऊत  

0
Sanjay Raut:'एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देणे हा पवारांचाच अपमान'-संजय राऊत  
Sanjay Raut:'एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देणे हा पवारांचाच अपमान'-संजय राऊत  

sanjay raut : शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थिती लावत त्यांचा सन्मान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वेग आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव हा पुरस्कार देण्यात आला होता.यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होते,असे वक्तव्य केल्याने ते शरद पवारांवर नाराज असल्याची चर्चा होती.यावर मी नाराज नाही.आम्ही पक्षाची भूमिका मांडली. एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देणे हा पवारांचाच अपमान आहे,असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सरकारवर जोरदार टीका केली.

नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर  

‘शरद पवारांवर अजिबात नाराजी नाही’ (Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले की,’शरद पवारांविषयी नाराजी असण्याचं कारण काय ? शरद पवारांवर अजिबात नाराजी नाही. आम्ही विशिष्ट घटनेपुरती आमची भूमिका मांडली. महाराष्ट्र ज्याला गद्दार म्हणून संबोधतो,ज्याने अमित शहांची हातमिळवणी करून,बेइमानी करून सरकार पाडलं,त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणे हा शरद पवारांचा अपमान आहे. महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणे जो शूर योद्धा दिल्ली पुढे कधी झुकला नाही. त्या महादजी शिंदेंचा हा अपमान आहे. ही आमची भूमिका आहे.मुळात हा खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार आहे’ असे संजय राऊत म्हणालेत

अवश्य वाचा : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका
‘जे टीका करतात त्यांना माझे आणि पवार साहेबांचे संबंध माहित नाहीत. शरद पवार आम्हाला पित्यासमान आहेत. ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. शिंदे गटाच्या लोकांना तोंडाची जबडे वाजवताना आम्ही पाहिले आहे. मी पवार साहेबांवर टीका केली नाही. मी पक्षाची भूमिका मांडली.’ असेही ते म्हणालेत.

‘आता यांना पवार साहेबांचा इतका पुळका का आला’?(Sanjay Raut)

‘आता यांना पवार साहेबांचा इतका पुळका का आलाय,हा किती खोटा आहे. अमित शहा महाराष्ट्रात येतात. शरद पवारांविषयी काहीही बोलतात. तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? हा पवार साहेबांचा अपमान नाही का? नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतात. बरच काही म्हणून जातात? अमित शहा यांनी किती खालच्या शब्दात टीका केली. तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते? तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही? आम्ही पक्षाचीच भूमिका मांडली. जर शिंदेंनी पक्ष फोडला नसता तर शरद पवारांचा पक्ष ही फुटला नसता.अजित पवार बाहेर गेले नसते,असं संजय राऊत म्हणाले. उलट ही शरद पवारांची सुद्धा भूमिका असायला हवी. मी बोललो माझ्या हिम्मत आहे. ही सगळी भंपक लोक आहेत. महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स करत आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here