नगर : भाजपला पक्ष फोडण्याची सवयच आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गटही भाजप फोडेल. एवढेच नव्हे तर चंद्राबाबू नायडू (Chandrababu Nayadu)आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांचाही पक्ष भाजप (Bjp)फोडेल,असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वर्तवलं आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात
‘भाजपला पक्ष तोडण्याची चटक लागलीय’ (Sanjay Raut)
एकनाथ शिंदे यांच्या गटात नवा उदय होणार आहे.मला कुणाची नावं घ्यायची नाही. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भाजपला ही पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही. देशभरात हाच प्रकार चालू आहे. चंद्राबाबूंचा पक्षही तोडला जाईल. नितीश कुमार यांचा पक्षही तोडला जाईल. यांच्या दाताला, जिभेला रक्त लागलं आहे. ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण सुरू राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अवश्य वाचा : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी
मनोज जरांगेंच्या उपोषणावरही भाष्य (Sanjay Raut)
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात फडणवीस यांचं सरकार आहे. विधानसभेच्या आधी यांच्यात काय चर्चा झाली हे महाराष्ट्राला माहीत नाही. जरांगे लढवय्ये नेते आहेत. ते समाजासाठी लढत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे.यापेक्षा आम्ही काहीच बोलू शकत नाही,असं सूचक विधान त्यांनी केलं.