Sanjay Raut : पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Attack) दहशतवादी (Terrorist) अजूनही मिळाले नाही. दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरुन (operation sindoor) राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत,असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
नक्की वाचा : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल
नीती आयोगाची बैठक रविवारी (ता.२५) झाली. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, स्वतः पंतप्रधान टीम इंडिया म्हणून काम करत नाहीत. ते भारताला विश्वासात घेत नाहीत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेत नाहीत. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनाही विश्वासात घेत नाहीत. आता तर त्यांनी पहलगाम हल्ल्याचे राजकारण सुरू केले. नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा ऑपरेशन सिंदूर बद्दल चर्चा होते. दुसरीकडे आम्हाला पहलगाम हल्ल्याचे राजकारण करू नका,असा सल्ला देतात. मोदी यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग,फोटो वापरुन राजकारण होत आहे,असा आरोप राऊत यांनी केला.
अवश्य वाचा : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली बीजमातेची भेट
‘पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी गायब’ (Sanjay Raut)
पहलगाममध्ये हल्ला झाल्यापासून हल्ला करणारे करणारे दहशतवादी गायब झाले आहे. त्यांचा शोध लागला नाही. अमेरिकेच्या दबावाखाली शस्त्रसंधी करण्यात आली. यापूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेतील दहशतवादी सुद्धा अजून सापडले नाही. परंतु त्या घटनेचे राजकारण केले गेले. आता पहलगाम मध्ये देखील असेच घडले आहे. त्याच्यामागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे,असा संशय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
‘अमित शाह यांनी राजीनामा द्यावा’ (Sanjay Raut)
तुम्ही तिन्ही सेनादलांना या युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. युद्ध जिंकत असताना माघार घेतली गेली. तुम्ही आमच्या २६ महिलांच्या कुंकवाचा अपमान करत आहात. या प्रकरणात अमित शाह यांचा राजीनामा मागायला हवा. त्यांच्या अपयशामुळेच ही वेळ आली आहे,असा आरोप राऊत यांनी अमित शाह यांच्यावर केला.