Sanjay Raut:देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल 

0
Sanjay Raut:देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल 
Sanjay Raut:देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल 

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे ? किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे? किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आहेत? याबाबत  फडणवीस यांनीच एसआयटी स्थापन केली पाहिजे,असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.  

नक्की वाचा : ‘गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही’;संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

‘महाराष्ट्राची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी’ (Sanjay Raut)

संजय राऊत यावेळी म्हणाले की, बीडच्या हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत असं कळलं आहे. कारण शेवटी ही महाराष्ट्राची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी.एक वाल्मिक कराडला अटक केली.पण बीडमध्ये हा खटला चालवू नये,अशी माझी मागणी आहे. हा इतका गंभीर विषय आहे की,हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे.महाराष्ट्रात कुठेही खटला चालला तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही तरीही मानतो की मुख्यमंत्र्यांवर सध्या तरी विश्वास ठेवू,असं राऊत म्हणालेत.

आपल्या सरकारला खून पचवायची सवय आहे. बीडचे आका, त्यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह असलेले फोटो. त्यांचा वावर, त्यांचा मंत्र्यांशी असलेला संवाद हे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात शंका येते आहे की खरंच न्याय मिळेल का? देवेंद्र फडणवीस फक्त बोलत आहेत की कुणालाच सोडणार नाही. पण आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलं आहे आणि किती जणांना कसं अडकवलं आहे? या विषयावर एक एसआयटी नेमली पाहिजे,संजय राऊत म्हणालेत.

अवश्य वाचा : सुरेश धस यांनी माफी मागितल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया

‘देवेंद्र फडणवीसांना सगळी प्रकरणं माहीत’ (Sanjay Raut)

बिल क्लिंटन आम्हाला माहीत होता आता बीड क्लिंटन आला आहे. देवेंद्र फडणवीसांना सगळी प्रकरणं माहीत आहेत. त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी तसंच जबाबदारीने काम करतो आहे यासाठी त्यांनी गुन्हेगार कितीही मोठा असो त्याचा विचार न करता न्याय दिला पाहिजे,असं राऊत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here