sanjay raut : गिरीश महाजन यांचा पक्ष जागेवर आहे का ? भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले आहेत. हातात पोलीस आहे, पैसे आहे. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत. त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन (Girish Mahajan) आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल,असा हल्लाबोल (Criticism) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केलं होतं. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
नक्की वाचा : मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार ?
‘शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली’ (Sanjay Raut)
संजय राऊत यावेळी म्हणाले की, प्रत्येकाची वेळ येते. आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची जी भाषा तुम्ही वापरत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, ती शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही करताय, तुम्ही राजकारणात कोण होतात ? आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभे राहून फोटो काढत होते, त्यावर आमचे लक्ष आहे. गिरीश महाजन जे बोलत आहेत, त्यांची भाषा त्यांच्या पक्षाला बुडवणार,असेही संजय राऊत यांनी म्हटले.
अवश्य वाचा : मोठी बातमी! शशांक अन् लता हगवणेच्या अडचणी वाढल्या;आणखी एक गुन्हा दाखल
‘शिवसेना संपवणे हे गिरीश महाजनांच्या दहा पिढ्यांना जमणार नाही’ (Sanjay Raut)
राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. महाराष्ट्र संपवण्याची ही शक्ती आहे. त्याचे गिरीश महाजन हे हस्तक आहेत. आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे. शिवसेना संपवणे हे गिरीश महाजनांच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. पाच-पंचवीस माणसं फोडणं म्हणजे पक्ष फोडणं असतं का? गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे. ही नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला.