Sanjay Shirsat:संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

0
Sanjay Shirsat:संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप
Sanjay Shirsat:संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

नगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट (Sinddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेकडून खळबळजनक आरोप (Married Woman) करण्यात आले आहेत. या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी, हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.

नक्की वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत 

विवाहित महिलेने दिलेल्या नोटीसमध्ये काय ?(Sanjay Shirsat )

सिद्धांत शिरसाट यांची ओळख २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आमच्यात रिलेशनशिपला सुरुवात झाली. त्या काळात आमच्या चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या. तसेच सिद्धांतने माझ्याबरोबर शारीरिक संबंध देखील ठेवले. सिद्धांत शिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं. धमक्या देऊन माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला. त्याच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला,असा आरोप विवाहित महिलेकडून करण्यात आलाय.

अवश्य वाचा : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी माहिती आली समोर;मारहाणीचे २९ पैकी ६ व्रण ताजे  

‘लग्नानंतर सिद्धांतच्या वागण्यात बदल’ (Sanjay Shirsat )

सिद्धांत आणि माझे लग्न १४ जानेवारी २०२२ रोजी बौद्ध पद्धतीने झाले असून त्याचे पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे विवाहित महिलेने या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहेत. लग्नच नाही तर सिद्धांत यांच्यासोबतच्या संबंधातून मला गर्भधारणा देखील झाली होती. मात्र, त्यांनी जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला,असंही विवाहित महिलेने म्हटलं आहे. सिद्धांतशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला. त्यांनी मला छत्रपती संभाजीनगर येथील घरी नेण्यास नकार दिला आणि चेंबूरमधील घरात राहण्यास भाग पाडले. यापूर्वीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली.

“पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करुन टाकेन” अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलाने दिल्याचे महिलेने म्हटलं आहे. संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात महिलेने २० डिसेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांचे वडिल राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई झाली नाही,असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय.

सात दिवसांच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे,अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असं वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.