Sanjay Shirsat:मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा राडा;नेमकं घडलं काय?

0
Sanjay Shirsat:मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा राडा;नेमकं घडलं काय?
Sanjay Shirsat:मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा राडा;नेमकं घडलं काय?

नगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घराबाहेर एका तरुणाने दारूच्या नशेत (Drunk) शिवीगाळ(Abductive) करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यात संबंधित तरुणाने मंत्री शिरसाट यांची वाहने आणि सुरक्षा यंत्रणेलाही लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ घुले असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

नक्की वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा ‘रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल;प्रकरण नेमकं काय ?  

नेमका प्रकार काय ? (Sanjay Shirsat)

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी रात्री ( ता.२०) उशिरा एका तरुणाने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. मंत्री निवास परिसरात गोंधळ घालत त्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ व धमक्याही दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार तरुण प्रचंड नशेत असताना मंत्री शिरसाठ यांना भेटायचे आहे असे म्हणत धिंगाणा करत होता. त्याने मंत्री निवासाच्या परिसरात गोंधळ घालत गाड्यांच्या मागे धाव घेतली. सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करत धमक्याही दिल्याचा प्रकार उघड झालाय. या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांना बोलवण्यात आले.  

अवश्य वाचा : सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित;सती प्रथेवर आधारित चित्रपट

धिंगाणा घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात (Sanjay Shirsat)

सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने मंत्री शिरसाठ यांच्या बंगल्याबाहेर धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग केल्याचा व शासकीय व्यक्तींच्या सुरक्षेला बाधा निर्माण केल्याचा ठपका आरोपी तरुणावर ठेवण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर पहारा वाढवला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून या घटनेचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.