श्रीगोंदा : येथे विकसित भारत संकल्प यात्रा (Developed Bharat Sankalp Yatra) रथाचे आमदार बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते (MLA Babanrao Pachpute) यांच्या हस्ते तीन महिला बचत गटांना (Women’s self-help group) दुग्ध व्यवसायाकरिता दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत कर्ज वाटप (Loan Allocation) करण्यात आले. तसेच किंक बाॅक्सींग मधील राष्ट्रीय खेळाडू प्रज्वल ढवळे यांचा सन्मान करण्यात आला.
नक्की वाचा : महापालिकामध्ये प्रशासक राज सुरू; प्रशासकपदी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांची नियुक्ती
यावेळी आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड वितरण आणि आरोग्य शिबीर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जन-धन, प्रधानमंत्री जीवनज्योती,आधार अद्ययावत/दुरुस्ती , महिला बचतगट कर्ज, प्रधानमंत्री स्वनिधी असे सर्व योजनेचे स्टाॅल श्रीगोंदा (shrigonda) नगरपालिकेने लावले.
अवश्य वाचा : तलवारीचा धाक दाखवून १० लाख रुपये लुटले
यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सविता ससाणे, सुनीलराव मांडे, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगरसेवक शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, अशोक खेंडके,संतोष क्षीरसागर, सीमा गोरे, बापू गोरे,अंबादास औटी, कांतीलाल खेतमाळीस, भगवानराव वाळके उपस्थित होते.