Sankalp Thorat : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; आंतरराष्ट्रीय पातळीवर करणार भारताचे प्रतिनिधित्व

Sankalp Thorat : नगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिक ॲम्बेसेडर; आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

0

Sankalp Thorat : नगर : अथेन्स (ग्रीस) येथे जूनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय यंग ऑलिम्पिक ॲम्बेसेडर (International Young Olympic Ambassador) सत्रासाठी नगरचा राष्ट्रीय खेळाडू संकल्प निर्मलचंद्र थोरात (Sankalp Thorat) याची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee) व इंटरनॅशनल ऑलिम्पिक अकॅडमी ह्यांच्या सहकार्याने दोन आठवड्यांचा हा कार्यक्रम ६ ते १८ जुन २०२६ होईल. त्यात संकल्प भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होईल. त्याच्या रूपाने नगरला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे.

अवश्य वाचा : कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी मंजूर; तांबे यांच्या प्रयत्नांना यश

शिवछत्रपती पुरस्कारविजेते निर्मलचंद्र थोरात यांचा मुलगा

राष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू व खो-खो स्पर्धेतील पदकविजेता असलेला संकल्प शिवछत्रपती पुरस्कारविजेते निर्मलचंद्र थोरात यांचा मुलगा आहे. संकल्प सध्या टाटा ट्रस्ट्स आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या ‘ग्रासरूट्स क्रीडाकुल’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात कार्यक्रम व्यवस्थापक पदावर काम करतो. ग्रामीण खेळाडूंच्या क्रीडा, आरोग्य आणि जीवनकौशल्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी (Sankalp Thorat)

संकल्पचे शालेय शिक्षण सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत व महाविद्यालयीन शिक्षण पेमराज सारडा महाविद्यालयात झाले. रोहटक येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेतून त्याने ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ची पदवी मिळविली आहे. मैदानावरचे धडे त्याने निर्मलनगरच्या एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर गिरविले. त्याच्या निवडीने नगरच्या क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

Sankalp Thorat : नगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिक ॲम्बेसेडर; आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
Sankalp Thorat : नगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिक ॲम्बेसेडर; आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

यंग ऑलिम्पिक ॲम्बेसेडर कार्यक्रम
यंग ऑलिम्पिक ॲम्बेसेडर कार्यक्रम हा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि नेतृत्व विकास कार्यक्रम आहे. त्यांच्यामार्फत त्यांच्या देशात ऑलिम्पिक मूल्यांचा प्रसार करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. त्यात विविध देशांचे क्रीडा क्षेत्रातील युवा प्रतिनिधी सहभागी होतात. त्यांना दोन आठवड्यांच्या सत्रामध्ये ऑलिम्पिकची मूल्ये, क्रीडा क्षेत्रातील नीतिमत्ता आणि नेतृत्व, जागतिक क्रीडा व्यवस्थापन, खेळाच्या माध्यमातून विकास याबाबत मार्गदर्शन केले जाते.