नगर : अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्री कृष्णाच्या (Shrikrushna) रुपातील मनमोहक फोटो टाकून प्रेक्षकांना मोहित केलं होत. मात्र तिचा हा लूक नक्की कशासाठी होता याच उत्तर आज संस्कृतीने प्रेक्षकांना दिलं आहे. कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी संस्कृती बालगुडे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. आता ती अजून एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फॅशन कॉन्सेप्ट फोटोशूट आणि अभिनय यांच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असलेली संस्कृती लवकरच एका डान्स ड्रामामधून (Dance Drama) प्रेक्षकांना मोहित करणार आहे.
नक्की वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
‘संभवामि युगे युगे’ या नृत्य ड्रामामधून काय उलगडणार ? (Sanskruti Balgude)
आजवर संस्कृतीने अनेक मुलाखती मधून तिच आणि श्री कृष्णाच असलेलं नातं या बद्दल भाष्य केलं आहे.आता संस्कृती एक कमाल नवीन डान्स ड्रामा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृतीने सोशल मीडिया वर पोस्ट करून ही खास गिफ्ट तिच्या फॅन्सला दिलं आहे. संस्कृतीच्या नव्या प्रोजेक्टच नाव खूप लक्षवेधी असून “संभवामि युगे युगे ” या नृत्य ड्रामा मधून काय अनुभूती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
अवश्य वाचा: मतासाठी नरेंद्र मोदींना नाचायला सांगितले तर ते नाचतीलही- राहूल गांधी
संस्कृती बालगुडे काय म्हणाली ? (Sanskruti Balgude)
या बद्दल बोलताना संस्कृती सांगते ” मला समजलेल्या कृष्णाबद्दल मला छान काहीतरी करावसं वाटतं असताना गेले वर्षभर ही संकल्पना माझ्या मनात होती आणि मुळात मी या संपूर्ण ड्रामासाठी स्वतः हा नृत्य दिग्दर्शन केलं आहे. या शोमधून मला उमजलेल्या कृष्णा बद्दलची गोष्ट, आयुष्यात घडलेल्या घटना या कृष्णरुपी पद्धतीने मांडायचा होत्या आणि त्या भरतनाट्यम नृत्य सादरीकरणातून मांडता येणार आहेत याचा खूप आनंद आहे. मुळात मला फक्त इव्हेंटच्या निमित्तानं भरतनाट्यम करण्याची संधी मिळायची पण माझ्या आवडत्या डान्स फॉर्ममधून हा संपूर्ण शो करण्याची संधी या निमित्तानं मला मिळतेय, असं तिने सांगितले आहे.



