Sant Dnyaneshwar : अकोले : वाचन (Reading) हा आयुष्य घडविणारा मोलाचा संस्कार असून उत्तम तसेच कसदार ते वाचावे. संत तुकारामांनी ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ असा सार्थ दाखला दिला. संत ज्ञानेश्वरांनी (Sant Dnyaneshwar) अभंगातून मौलिक विचार अन् आत्मिक ज्ञान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक (Senior Writer) डॉ. सुनील शिंदे यांनी केले.
नक्की वाचा : भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम
अकोलेतील अगस्ति महाविद्यालयात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने) आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रम व्याख्यानमालेत वाचन कौशल्य याविषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. विजय भगत होते. अकोले तालुक्यातील महान साहित्य परंपरेचे साधार दाखले देताना डॉ. शिंदे पुढे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या परिवर्तनशील पुरोगामी तालुक्याला दर्जेदार लेखनाची थोर परंपरा आहे. बलुतंकार दया पवार, गो. नि. दांडेकर, ग. ल. ठोकळ, दु. का. संत अशा साहित्यिकांचा वारसा लाभला असून प्राचीन आध्यात्मिक साहित्य पंरपरेत दत्त वरद विठ्ठल, निरंजन रघुनाथ, चंडीराम तसेच आधुनिक काळात बालयोगी ओतूरकर नारायणानंद यांच्या दत्तोपासनेची आणि तत्वचिंतक रचनाकारांची परंपरा आहे.
अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी
उमेदीच्या काळात काय वाचावे, (Sant Dnyaneshwar)
काय वाचू नये हे सुद्धा समजून घ्यायला हवे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी यांच्या लेखनाचे सातत्याने वाचन असावे, असे ते म्हणाले. संवेदनशीलतेबरोबरच सर्व घटकांशी संवाद हवा. द्वेष-क्रोधाचे लेखन माणुसकीला मारते. माणूसपण रुजविणारी पुस्तके जपली पाहिजेत, असे डॉ. भगत म्हणाले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. साहेबराव गायकवाड यांनी केले. स्वागत आणि परिचय डॉ. सुनील घनकुटे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. प्रवीण घुले यांनी केले.