Sant Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

Sant Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

0
Sant Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा
Sant Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

Sant Godad Maharaj : कर्जत: कर्जतचे (Karjat) ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांचा (Sant Godad Maharaj) रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. मध्यरात्रीपासून संत शिरोमणी सदगुरु गोदड महाराजांच्या मंदिरात अभिषेक सुरू होता. पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दुपारी एकच्या सुमारास महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेस निघाला असता रथ ओढण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke), आमदार रोहित पवार (Rohit Pawar), आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी संत सदगुरु गोदड महाराज यांचे दर्शन घेतले. काही काळ भाविकांसोबत राहत सेवा पार पाडली.    

नक्की वाचा : ‘गोदावरी’च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी

रथामध्ये मूर्ती स्थापन करून ग्रामप्रदक्षिणा

कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव बुधवारी (ता.३१) मोठ्या भक्तीभावाने आणि धार्मिक कार्याने पार पडला. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई, गाभारा परिसरात फुलांची आकर्षक सजावट डोळ्याचे पारणे फेडत होती. मेघडंबरीस चांदीची सजावट, मंदिर प्रवेशद्वारास पितळी पायरी मंदिरास शोभा देणारी होती. बुधवारी मध्यरात्रीपासूनच गोदड महाराज मंदिरात अभिषेकास सुरुवात झाली. पंचक्रोशीतील मानाच्या दिंड्या हरिनामाचा गजर करीत कर्जतमध्ये दाखल होत. सकाळी ९ वाजता मानाचा भगवा ध्वज पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांच्यासह तालुका पोलीस प्रशासनाने सवाद्य मंदिरावर चढविला. तर दुपारी शासकीय पुजा तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या हस्ते यात्रा कमिटीच्या उपस्थितीमध्ये मानकरी, सेवेकरी आणि पुजेकरी यांच्या हस्ते झाली. पूजा संपन्न होताच रथामध्ये मूर्ती स्थापन करताच संत सदगुरु महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना झाला. यावेळी जय हरीच्या घोषणेने भाविकांनी परिसर दणाणून सोडला होता.

अवश्य वाचा : भंडारदरा धरण ९० टक्के भरले; काेणत्याही क्षणी पाणी साेडण्याची शक्यता

रथास पुष्पहार आणि नारळाचे तोरण अर्पण (Sant Godad Maharaj)

दोरीच्या साह्याने रथ ओढण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चालत्या रथाला नियंत्रीत आणि दिशा देण्याचे काम ओटी लावणारे मानकरी सेवाभावाने करीत असतात. रथाच्या पुढे मानाच्या दिंड्या आपल्या भक्तिमय रंगात न्हावून निघाले. शहरातील ठिकठिकाणी रथास पुष्पहार आणि नारळाचे तोरण अर्पण केले जात होते. यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Sant Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा
Sant Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

गुरुवारी (ता.१) शहरात कुस्त्यांचा हगामा भरला जाणार असून या हगाम्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी लावणार असल्याची माहिती संत श्री गोदड महाराज यात्रा कमिटीकडून देण्यात आली. संत सदगुरु गोदड महाराजांच्या रथोत्सवासाठी ईदगाह मैदान, दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात आणि बसस्थानक परिसरात  मनोरंजन नगरी उभारण्यात आली आहे. या मनोरंजन नगरीत मोठं-मोठे रहाट पाळणे, जादूचे प्रयोग, विविध दुकाने आणि खाद्यस्टॉल असून याकडे देखील हौशी मंडळींनी वर्णी लावली. दोन दिवसात या नगरीत कोट्यवधीची उलाढाल होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. मागील १ हजार ३९९ दिवसांपासून स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत आणि हरित कर्जतसाठी सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमीचे शेकडो हात राबत आहे. मागील वर्षीप्रमाणे गोदड महाराज रथाचे ओटी लावणाऱ्या मानकऱ्यांनी महाराजांचा तीन मजली लाकडी रथ मंदिरासमोर आणण्याचा मान याच श्रमप्रेमींना दिला. यावेळी संत सदगुरु गोदड महाराजांच्या गजराने परिसर दणाणून सोडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here