Sant Godad Maharaj : कर्जत: यावर्षी कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज (Sant Godad Maharaj) यांचा रथोत्सव तिरंग्याच्या (Tirangaa) रोषणाईत उजळणार आहे. शहरातील ग्रामप्रदक्षिणेच्या संपूर्ण रथ मार्गावर रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजप (BJP) नेते प्रवीण घुले (Pravin Ghule) यांनी पत्रकार परिषदेत दिली. या रोषणाईची सुरुवात संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरापासून बुधवारी संध्याकाळी नगराध्यक्षा रोहिणी घुले (Rohini Ghule) यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सुवर्णा सुपेकर उपस्थित होत्या. या नूतन उपक्रमाचे कौतुक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
यात्रा कमिटी, कर्जत नगरपंचायत आणि प्रशासनाची तयारी
२१ आणि २२ जुलै रोजी धाकट्या पंढरीत कर्जतमध्ये ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव पार पडणार आहे. यात्रा कमिटी, कर्जत नगरपंचायत आणि स्थानिक प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक वर्षांपासून संत सदगुरु गोदड महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना होत असताना महावितरण रथाचे सेवेकरी यांच्या सुरक्षिततेसाठी विजेचा पुरवठा बंद करीत असे. यामुळे अंधारातच भाविकांना रथ दर्शन घ्यावे लागत होते.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
संपूर्ण रथ मार्गावर एबी केबल टाकत प्रकाश झोत (Sant Godad Maharaj)
सदरची बाब भाजप नेते प्रवीण घुले यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निदर्शनास आणत यावर सकारात्मक तोडगा काढला. आणि संपूर्ण रथ मार्गावर एबी केबल टाकत प्रकाश झोतात यंदाचे रथ दर्शन पार पाडण्याचा चंग बांधला. यावर संत सदगुरु मंदिर प्रभागाच्या नगरसेविका सुवर्णा रवी सुपेकर यांनी मंदिर परिसर यासह संपूर्ण रथ मार्गावरील हायमास्ट पोलला तिरंगी रोषणाई करण्याचा ध्यास घेतला. त्याची सुरुवात बुधवारी संध्याकाळी गोदड महाराज गल्लीतून करण्यात आली. नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, प्रवीण घुले यांच्या हस्ते तिरंगा लाईटचा स्वीच ऑन करण्यात आला. यावेळी नगरसेविका सुवर्णा सुपेकर, रवी सुपेकर, नगरसेवक भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल यांच्यासह अनिल काकडे, अर्जुन भोज, चेतन शहा, राजू धोत्रे, उमेश चावरे, आदित्य भोज, सुरज शेळके, विकी धोत्रे, गणेश मराठे आदी उपस्थित होते.