Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

0
Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण
Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

Sant Nivruttinath कर्जत: तालुक्यातील शेगुड येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ (Sant Nivruttinath) महाराज पालखी रथावर श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानाच्यावतीने भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करीत स्वागत करण्यात आले. यावेळी करमाळा (Karmala) तालुका प्रशासनातील प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी वारकरी (Warkari) महिला सोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी हरीनामाच्या आणि येळकोट येळकोट जय मल्हाराच्या गजराने शेगुड परिसर दुमदुमला होता. 

Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण
Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका

पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत

शेगुड (ता.कर्जत) खंडोबा नगरीत नाशिक येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पालखी रथावर खंडोबा देवस्थान समितीच्यावतीने भंडारा उधळण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भंडाऱ्याने पिवळसर होत वारकरी भंडाऱ्यात न्हावून निघाले. एकीकडे हरिनामाचा गजर तर दुसरीकडे येळकोट, येळकोट जय मल्हाराचा गजरात भाविक पालखी रथाचे दर्शन घेत होते.

Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण
Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

पालखीचा सोलापूर हद्दीत प्रवेश

शेगुड लगत सोलापूर हद्द सुरू होत असल्याने करमाळा तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील पालखी स्वागतास हजेरी लावत हरिनामाच्या गजरात रंगले. यावेळी करमाळा उपविभागाचे प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी महिला वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. तर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी हजेरी लावत वारकऱ्यांसोबत टाळ, मृदुंग आणि विणाच्या निनादात भक्तीचा ठेका धरला. अखेर अहमदनगर जिल्ह्यातून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.

Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण
Sant Nivruttinath : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here