Sant Nivruttinath Maharaj : संगमनेर: “ज्ञानोबा माऊली तुकाराम…” या गजरात, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची (Sant Nivruttinath Maharaj) पालखी आणि पायी दिंडी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्त १० जून रोजी निघालेल्या या पायी दिंडीचे सोमवारी (ता.१६) दुपारी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे आगमन झाले. अश्विनीनाथ महाराज गडावरती आमदार अमोल खताळ (Amol Khatal) आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे (Shirdi) अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्यांचा सरकारला संतप्त सवाल
पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने जेसीपीतून पुष्पवृष्टी
संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथील अश्विनीनाथ गडाच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आल्यानंतर या पालखीवर पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने जेसीपीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीच्या बैल जोडीचा दोर हाती घेतला. अश्विनीनाथ गडाच्या पायथ्यापासून ते पारेगाव गावापर्यंत आमदार अमोल खताळ यांनी गळ्यात विना घातला होता तर व त्यांच्या पत्नी नीलम खताळ या डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होऊन पायी चालत “विठ्ठल-नामच्या जयजयकारात तल्लीन झाले होते. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲड. सोमनाथ घोटेकर यांचे हस्ते आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ, संत निवृत्ती महाराज प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.
अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
लेझीम नृत्य तसेच टाळ मृदुंगाचा गजर (Sant Nivruttinath Maharaj)
या पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ढोल ताशाच्या तालावर लेझीम नृत्य तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर केला. त्यामुळे पारेगाव नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आमदार अमोल खताळ यांच्या समवेत शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप, भाजप नेते भीमराज चत्तर, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, सरपंच संदीप देशमुख, साहेबराव घुगे, पारेगाव येथील रावसाहेब गडाख, सुरेश दळवी, किशोर गडाख, गणेश गडाख, भाऊ पाटील गडाख, अमोल दिघे, दत्तात्रय दिघे, गणेश संपत फड यांच्यासह ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.