Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

Sant Sadguru Godad Maharaj

0
Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी
Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

Sant Sadguru Godad Maharaj : कर्जत: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज (Sant Sadguru Godad Maharaj) मंदिरात पहाटेपासूनच भाविक-भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाने आणि हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला. यावेळी मंदिरात आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी
Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त

मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

धाकटी पंढरी कर्जत येथे आषाढी एकादशीनिमित्त संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत ज्ञानोबा, माऊली, तुकाराम यासह हरिनामाचा गजर आणि संत सदगुरु गोदड महाराज की जय या गजराने भाविकांनी मंदिर दणाणून सोडले होते. गोदड महाराज देवस्थानची एक जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे. गोदड महाराजांनी कर्जत येथे संजीवन समाधी घेतली होती.

Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी
Sant Sadguru Godad Maharaj : संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट (Sant Sadguru Godad Maharaj)

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी पहाटेपासूनच पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी दर्शनासाठी दोन्ही बाजूस रांगा लावल्या होत्या. एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शन सुलभ व्हावे, यासाठी गोदड महाराज मंदिर समितीच्यावतीने बॅरेकेटींग लावण्यात आले होते. सायंकाळी संत सदगुरु गोदड महाराजांची दिंडी टाळ-मृदगाच्या गजरात हरिनामाचा गजर करीत कर्जत नगरीच्या प्रदक्षिणेसाठी रवाना झाली होती. यावेळी ठिकठिकाणी सडा, रांगोळी यासह दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.