Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुखांच्या हत्येचे ‘क्रूर’ फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न 

0
Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुखांच्या हत्येचे 'क्रूर' फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न 
Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुखांच्या हत्येचे 'क्रूर' फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न 

Santosh Deshmukh Murder : मागील तीन महिन्यांपासून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरण हे महाराष्ट्रात चांगलंच चर्चेचा विषय ठरलय. सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) इतर सात जणांनी संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करत ९ डिसेंबरला त्यांची हत्या केली. आता पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्यानंतर काल (ता.३) देशमुखांच्या हत्येचे फोटो बाहेर आलेत. हे फोटो पाहताना कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. फोटो पाहिल्यांनंतर देशमुखांना किती निर्दयीपणे मारण्यात आले याची कल्पनाही करवत नाही. आता या प्रकरणात समोर आलेल्या या फोटोची कहाणी आपण पाहुयात..

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार  

आरोपी महेश केदारच्या फोनमधून फोटो व व्हिडिओ जप्त (Santosh Deshmukh Murder)

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही,तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण,राजकारण ढवळून निघालंय.सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत ६६ पुरावे आणि १८४ जबाब महत्त्वाचे ठरलेत. या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात.संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर माणसाच्या रुपातला राक्षस कॅमेऱ्यानं कैद केला असल्याचं दिसतंय. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : ‘चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी’;आरोपी दत्ता गाडेच्या भावाची मागणी 

फोटोंमध्ये नेमकं काय ? (Santosh Deshmukh Murder)

या हत्येप्रकरणी समोर आलेल्या पहिल्या फोटोत संतोष देशमुखांना जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर आरोपी जयराम चाटे हा संतोष देशमुख यांची पँट काढतांना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा तिथे घडत असलेल्या अमानुष कृत्याचा सेल्फी घेत हैवानासारखा हसत असल्याचं दिसतंय. तिसऱ्या फोटोत बेदम मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झालेले दिसतायेत मात्र तेव्हा आरोपी प्रतीक घुले हा देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करतानाचे लाजिरवाणे चित्र पाहायला मिळालंय.

चौथ्या फोटोत आरोपी सुदर्शन घुले हा देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढताना दिसत आहे. त्यावेळी या हैवानाच्या चेहऱ्यावर वेगळाच आवेश पाहायला मिळतोय. पाचव्या फोटोत मारेकरी जयराम चाटे हा संतोष देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतोय. तसेच हा काढलेला शर्ट हातात धरुन हसत असल्याचं पाहायला मिळालय. यानंतर मारेकऱ्यांनी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार केलेत.त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचं या फोटोत दिसून येत आहे. यावेळी वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारुन हे वार केल्याचं दिसत आहे. हे दृश्य पाहून जल्लाद – राक्षसांना पाझर फुटेल,मात्र अशावेळी महेश केदार हे सारं हसत हसत शूट करत असल्याचे फोटोत दिसतय. या सगळ्या मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे,असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती केली असल्याचं पाहायला मिळालं आहे. या हैवानासारख्या मारहाणीनंतर संतोष देशमुखांचं शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे फोटोत पाहायला मिळालंय.

हे सगळे फोटो पहिल्यांनंतर आरोपींनी संतोष देशमुख यांची किती हाल हाल करून हत्या केली हे समोर आलं आहे. हे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं दिसत आहे. आता या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलय. मात्र वाल्मिक कराडसह बाकीच्या आरोपींना  न्यायालय काय शिक्षा देणार हेच पाहणे आता महत्वाचे ठरेल.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here