नगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे. तर इतर आरोपी कारागृहात आहे. काल (ता.२७) या प्रकरणाची पहिली सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. आता या प्रकरणातील एक आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule)याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब (Confession) दिला आहे. कोठडी दरम्यान त्याने ही कबुली दिल्याचे समोर आले आहे.
नक्की वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते,त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला’-संभाजी भिडे
सुदर्शन घुलेने जबाबात काय सांगितले?(Santosh Deshmukh Murder)
सरपंच संतोष देशमुख यांचा अवादा कंपनीच्या टॉवर प्रकरणात आरोपींशी वाद झाला होता. या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासोबत देशमुख यांचा पहिला वाद झाला. त्यानंतर आरोपींनी ६ डिसेंबरपासून त्यांची हत्या करण्याचा घाट घातला. या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड हाच मार्गदर्शन करत असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.आता या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले याने खुनाची कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची कबुली घुले याने दिली. त्यामुळे हा खून एका मोठ्या कटाचा भाग होता हे आता समोर आले आहे.
अवश्य वाचा : ‘देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर धरणार लावणीवर ठेका!
‘आठ आरोपींवर मकोका’ (Santosh Deshmukh Murder)
संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार हे आरोपी आहे. आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तर आता सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खून केल्याची कबुली दिली आहे. घुलेसोबतच जयराम चाटे आणि महेश केदार याने सुद्धा देशमुख यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. मात्र वाल्मिक कराडचा जबाब अजून समोर आलेला नाही.