Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

0
Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

नगर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी (CID Custody) देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या तीनही आरोपींना तब्बल २५ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा : आता शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी होणार;मंत्री दादा भुसेंचं आश्वासन  

मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसानंतर तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या.अजून या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे.

अवश्य वाचा : अभिनेत्री पूजा सावंतचं भावनिक मुद्द्यावर स्वामी समर्थांना पत्र

डॉ. संभाजी वायभासेंनाही अटक (Santosh Deshmukh Murder)

आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभासेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याच चौकशीत या आरोपींचा ठावठिकाणा कळाल्याचं सांगण्यात येतंय.या दोन मुख्य आरोपींसह, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता.

आरोपी कृष्णा आंधळे फरार (Santosh Deshmukh Murder)

या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली. ज्यांच्या संपर्कात हे तीनही लोक होते. त्यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर संतोष देशमुखांचा ठावठिकाणा सांगणारा तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here