Satish Bhosale Arrest:मोठी बातमी!खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
Satish Bhosale Arrest:मोठी बातमी!खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Satish Bhosale Arrest:मोठी बातमी!खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Satish Bhosale Arrest : सतीश भोसले (Satish Bhosle) उर्फ खोक्याला उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधून (Prayagraj) अटक (Arrest) करण्यात आली आहे. खोक्या हा आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेनं केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाले होते. त्यानंतर त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलं आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून तो फरार होता.

नक्की वाचा : मोठी बातमी!आनंदाचा शिधा योजना अखेर बंद 

पोलीस नेमकं काय म्हणाले? (Satish Bhosale Arrest)

सतीश भोसलेच्या अटकेप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की,”गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या हा फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. प्रयागराजला त्याचं शेवटचं लोकेशन सापडले. त्याला तिथून अटक करण्यात आली. आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे. दुसऱ्या राज्यात अटक केल्याने ट्रान्सिट रिमांड घ्यावी लागते. त्याकरता परवानगी घ्यावी लागते. लोकल कोर्टाची परवानगी घेऊन त्याला इथे आणण्यात येईल.”

अवश्य वाचा : आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू! 

पोलीस खोक्या भोसलेच्या मागावर का ?(Satish Bhosale Arrest)

भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याने लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर खोक्या भोसलेचा दुसरा व्हिडिओही व्हायरल झाला. यामध्ये तो पैशांचं बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, हातात-गळ्यात सोन्याचे दागिने घालून मिरवणे असे दृश्य दिसत होते. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले. त्यामुळे खोक्या भोसलेवर आतापर्यंत वन विभागात आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया काय?(Satish Bhosale Arrest)

“खोक्या भोसलेला अटक केली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केलीय, त्यासंदर्भात त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्यावर कारवाई होईल”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते विधानभवनात माध्यमांशी बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here