Satish Shah: विनोदी अभिनयाचा बादशहा हरपला!अभिनेते सतीश शाह यांचे निधन 

0
Satish Shah: विनोदी अभिनयाचा बादशहा हरपला! अभिनेते सतीश शाह यांचे निधन 
Satish Shah: विनोदी अभिनयाचा बादशहा हरपला! अभिनेते सतीश शाह यांचे निधन 

Satish Shah: अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘जाने भी दो यारो’, ‘उमराव जान’, ‘कभी हाँ कभी ना’ सारख्या चित्रपटांसह अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन (Passes away) झाले आहे. ते किडनीच्या आजारामुळे (Kidney disease) त्रस्त होते. वयाच्या ७४ व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?  

अभिनेते सतीश शाह यांची कारकीर्द  (Satish Shah)

अभिनेते सतीश शहा यांच्या पार्थिवावर उद्या (ता. २६) अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती आहे. सतीश शाह यांनी फिल्म टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले होते. सत्तरच्या दशकांत त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. १९७८ साली सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ या चित्रपटात त्यांना लक्षवेधी भूमिका मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ‘उमराव जान’, गमन, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ सारख्या चित्रपटातून भूमिका केल्या. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती कुंदन शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाने. चित्रपटांबरोबरच त्यांनी ‘यह जो है जिंदगी’, ‘फिल्मी चक्कर’, ‘घर जमाई’ सारख्या मालिकांमधून काम केले.

अवश्य वाचा:  सिडनीत ‘RO-KO’चा ‘हिट’शो! अखेरच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे  

विनोदी अभिनयाचा तारा निखळला  (Satish Shah)

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या इंद्रवर्धन या व्यक्तिरेखेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी मालिका-चित्रपटसृष्टीत सहज विनोदी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अगदी मोजक्या कलाकारांपैकी एक असलेल्या सतीश शाह यांचे जाणे त्यांच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांनाही चटका लावून जाणारे ठरले आहे.