Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंचा ‘पुस्तक तुला’ करून सन्मान

शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची 'पुस्तक तुला' केली. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तांबे यांचा हा अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी (ता.५) प्राप्त झाला

0
सत्यजित तांबेंचा ‘पुस्तक तुला’ करून सन्मान

नगर : विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांना एका अनोख्या पद्धतीने सन्मानित करण्यात आले. सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ (Rajeev Book Fest 2023) या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’ (Pustak Tula) केली. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तांबे यांचा हा अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी (ता.५) प्राप्त झाला. या कार्यक्रमादरम्यान आमदार तांबे यांना ‘ज्ञान उपासना सन्मान’ प्रदान करण्यात आला.

नक्की वाचा : नेवासा वकील संघाचा रास्ता रोकोचा इशारा

सत्यजीत तांबे म्हणाले की, मी नेहमी तरुणाईला सांगत असतो की, पुस्तकी ज्ञान वाढवा. कारण, पुस्तक हे माणूस घडवण्याचे काम करते. पुस्तक माणसाला ज्ञानी बनवतात. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे. तर पुस्तक माणसाच्या आयुष्याला वेगळी दिशा देत असतात. म्हणून आपण पुस्तकांच्या सहवासात सातत्याने राहिले पाहिजे. या पुस्तक तुलेसाठी वापरलेली पुस्तकं आता विविध संस्थांना आणि गरजू विद्यार्थ्यांना दान करण्यात येतील.

हेही वाचा : ‘आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू’ – राधाकृष्ण विखे पाटील   

एखाद्या नेत्याचा पुस्तक तुला करून केलेला सन्मान आपण पहिल्यांदाच पाहिला आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फिटले,अशी प्रतिक्रिया या वेळी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शक प्राध्यापक विठ्ठल कांगणे व्यक्त केली. तसेच  पुस्तक हे माणसाचे आयुष्य घडवते. त्यामुळे वाचनसंस्कृती जपली पाहिजे. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं काम आमदार सत्यजीत तांबे करत आहेत, अशी भावना देखील  त्यांनी व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here