Satyajeet Tambe : परतफेड करण्याचे त्यांच्याशी चर्चा करून ठरवणार : आमदार तांबे

Satyajeet Tambe : परतफेड करण्याचे त्यांच्याशी चर्चा करून ठरवणार : आमदार तांबे

0
Satyajeet Tambe : परतफेड करण्याचे त्यांच्याशी चर्चा करून ठरवणार : आमदार तांबे
Satyajeet Tambe : परतफेड करण्याचे त्यांच्याशी चर्चा करून ठरवणार : आमदार तांबे

Satyajeet Tambe : संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने (BJP) मला पाठिंबा दिलेला नव्हता तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आणि त्यांच्या यंत्रणांनी मला भूमिपुत्र म्हणून पाठिंबा दिला होता. त्यामुळे परतफेड करण्याची वेळ आली तर त्यांच्याशी चर्चा करून परतफेड करणार असल्याचे मिश्किल वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Division Graduate Constituency) आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार कट्ट्यावर केले.

Satyajeet Tambe : परतफेड करण्याचे त्यांच्याशी चर्चा करून ठरवणार : आमदार तांबे
Satyajeet Tambe : परतफेड करण्याचे त्यांच्याशी चर्चा करून ठरवणार : आमदार तांबे

नक्की वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल

महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी प्रचंड खालावली (Satyajeet Tambe)

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मिट द प्रेस या पत्रकार कट्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना ते बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीला मत देणे म्हणजे बीजेपीला मत तसेच वंचित म्हणजे बीजेपीची बी टीम असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु आता नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचेच आमदार फुटल्याने काँग्रेस ही ए टीम कशी होऊ शकत नाही यावर बोलताना तांबे म्हणाले की, बी टीम म्हणजे छुप्या पद्धतीने अजेंडा असेल तर त्याला बी टीम म्हणतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार फुटले म्हणजे ते पूर्णच गेलेत असेही उत्तर त्यांनी यावेळी दिले. सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी प्रचंड खालावली आहे. अशा परिस्थितीत आपण सध्या अपक्ष म्हणूनच बरे असे सांगत राजकारणात नेत्यांची महत्त्वकांक्षा प्रचंड वाढल्याने अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण थेट कुटुंबापर्यंत आल्याने कौटुंबिक कलह वाढले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा: कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की (Satyajeet Tambe)

सध्या गाजत असलेल्या आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, संधीपासून वंचित असलेल्या जात समूहाला आरक्षणाची गरज आहे. किमान तीन पिढ्यांना फायदा झाला तरच ते कुटुंब किंवा समाज सक्षम होतो. परंतु वारंवार एकाच कुटुंबाला आरक्षणाचा फायदा होत असेल तर त्याचाही सर्व्हे करणे गरजेचे आहे. त्यासाठी जात जनगणना करणे देखील गरजेचे असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले. विकास आणि युवकांना रोजगार याविषयी आपले मत मांडताना आमदार तांबे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात आणि तांबे परिवार काॅंग्रेसी विचारधारेला मानणारा परिवार आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीत मोठे नाट्य घडले आणि तांबे परिवाराला काॅंग्रेसपासून अलिप्त व्हावे लागले. आपण पक्ष संघटना, जिल्हा परिषद या माध्यमातून समाजकारण राजकारणात आहोत. आपल्या राजकारणाचा आणि पदाचा वापर सर्वसामान्य नागरिकांना व्हावा, यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असतो. विधानसभेपेक्षा विधानपरिषदेचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने आपल्याला काम करण्याची अधिक संधी मिळाली आहे. परंतु संधी मिळाल्यास आपण विधानसभा नक्की लढवू, असे सांगताना मतदारसंघ सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 

शहरातील प्रश्न आणि शहराचा विकास याबद्दल बोलताना आमदार तांबे म्हणाले, परदेशात नदीची पुजा करण्याऐवजी नदीला तीचा हक्क कसा मिळेल आणि तिचे मूळ स्वरूप कसे कायम राहिल याची काळजी घेतली जाते. परंतु आपल्याकडे तसे होत आहे. परंतु आपण याबाबत नदी सुधार प्रकल्प योजना आखत असून शहरातून जाणाऱ्या नदिवर एक ठिकाणी पाहण्याची जागा, कपडे धुण्यासाठीची जागा, मनोरंजन स्थळ, बोटिंग असे भाग करताना नदीचे पात्र महामार्ग पुलापासून ते सेंट मेरी स्कूल पर्यंत एकसारखे करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर काही कारणास्तव बंद करावा लागलेल्या भूजल गटार योजनेत पुन्हा नव्याने काही बदल करून व आधुनिक एसटिपी प्लांट उभारून शहरातील व शेजारील गावांमधून येणाऱ्या गटारीच्या पाण्याची विल्हेवाट करण्यात येणार आहे. संगमनेर शहरातील व बाहेर गावांवरून रोज येणाऱ्यांची संख्या जवळपास दीड लाखाच्या पुढे आहे. परंतु त्यांच्यासाठी पुरेसे स्वच्छतागृह नाही त्यामुळे त्याची लवकर उभारणी करण्यात येणार आहे. शहरात रहदारीचा मोठा प्रश्न आहे परंतु याला नागरिकांचा बेशिस्तपणा जास्त कारणीभूत आहे. पार्किंग, शिस्त आणि अतिक्रमण या तीन गोष्टींवर काम झाल्यास शहराचा चेहरा बदलून जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here