Satyajeet Tambe : एनर्जी ड्रिंक धोकादायकच; आमदार तांबे यांनी सभागृहात वेधले लक्ष

Satyajeet Tambe : एनर्जी ड्रिंक धोकादायकच; आमदार तांबे यांनी सभागृहात वेधले लक्ष

0
Satyajeet Tambe : एनर्जी ड्रिंक धोकादायकच; आमदार तांबे यांनी सभागृहात वेधले लक्ष
Satyajeet Tambe : एनर्जी ड्रिंक धोकादायकच; आमदार तांबे यांनी सभागृहात वेधले लक्ष

Satyajeet Tambe : संगमनेर: सध्याची युवा पिढी ‘एनर्जी ड्रिंक्स’ (Energy Drink) चे ‘टीन’ एका मागोमाग एक रिचून आम्ही कसे हुशार असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढून क्षणार्धात हृदयाचे कार्य (Heart function) थांबण्याचा धोका आता वाढतोय. वैद्यकीय संशोधनातून तज्ज्ञांनी हा धोका अधोरेखित केला आहे. तसेच नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनीही याबाबत सरकारचे (Govt) लक्ष वेधले आहे. आता यावर काय निर्बंध लागतात, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे

हृदयावर परिणाम होण्याचा धोका

विशेषतः शहरांमधील पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलांमध्ये ‘एनर्जी ड्रिंक’ पिणारा एक मोठा वर्ग आहे. या ड्रिंकमुळे आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, असा विश्वास त्यांना वाटतो. कारण, या ड्रिंकमध्ये कॅफिन, टॉरीन अशा शरीराला उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचे प्रमाण जास्त असते. या उत्तेजित पदार्थांचे प्रमाण हा विषय नेहमी वैद्यकीय तज्ज्ञांमधील वादाचा राहिला आहे. या पदार्थांमुळे शरीरातील रक्तदाब कमी वेळेत खूप वाढतो. त्याचा थेट परिणाम हृदयावर होण्याचा धोका असल्याचे संशोधनातून माहिती पुढे आली आहे.

अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट

युवा वर्गाच्या आरोग्याला धोका (Satyajeet Tambe)

एकाच वेळी दोनपेक्षा जास्त ‘एनर्जी ड्रिंक’चे टीन फस्त करणे, हे धोकादायक आहे. त्यातून हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही वेळा एनर्जी ड्रिंकचे कमी वेळेत खूप प्यायल्यास हृदयविकाराचे झटकेही आल्याची नोंद वैद्यकशास्त्रात झाली आहे.आमदार तांबे यांनी सरकारचे लक्ष वेधत म्हटले की, एनर्जी ड्रिंक आपल्याकडे फार प्रसिद्ध झाले आहे. एका कंपनीने जाहिरातीद्वारे हिरो काही सेकंदात पंधरा मजले चढून जातो त्यामुळे शाळेतील, कॉलेजमधील मुलं ते एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले. त्यामुळे युवा वर्गाच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागला आहे. कॅफिनच्या प्रभावामुळे माणसाला तात्पुरती ऊर्जा मिळते. त्यातून माणूस हे पेय एकामागून एक घ्यायला लागतो. त्यातून आरोग्याला धोका निर्माण होतो. रक्तदाब, डायबेटीस, अपचन, नैराश्य आशा अनेक गोष्टींना आजचे तरुण आणि भावी पिढी संकटात टाकत असल्याचेही तांबे यांनी सभागृहात अध्यक्षांना निदर्शनास आणून दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here