Satyajit Tambe : पत्रकारांच्या प्रश्नांविषयी आमदार सत्यजित तांबे यांचा विधानपरिषदेत आवाज

Satyajit Tambe : पत्रकारांच्या प्रश्नांविषयी आमदार सत्यजीत तांबे यांचा विधानपरिषदेत आवाज

0
Satyajit Tambe : पत्रकारांच्या प्रश्नांविषयी आमदार सत्यजीत तांबे यांचा विधानपरिषदेत आवाज
Satyajit Tambe : पत्रकारांच्या प्रश्नांविषयी आमदार सत्यजीत तांबे यांचा विधानपरिषदेत आवाज

Satyajit Tambe : संगमनेर : राज्यातील संपादक, पत्रकारांच्या (journalist) प्रश्‍नांवर शासन दरबारी सातत्याने आवाज उठविणार्‍या व त्यासाठी सतत पाठपुरावा करणार्‍या संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची भेट घेऊन पत्रकारांच्या समस्या मांडल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी या मागणीची विशेष दखल घेत विधानपरिषदेत (Legislative Council) औचित्याचा मुद्दा उपस्थित करून पत्रकारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. विधान परिषद सभापती निलम गोर्‍हे (Nilam Gorhe) यांनी या प्रश्‍नांची नोंद घेऊन कार्यवाही करण्याचे सरकारला सुचित केले.

हे देखील वाचा : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा


आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत संघटनेच्या नावासह संदर्भ देत पत्रकारांसाठी महामंंडळ असले पाहिजे, डिजीटल माध्यमांमधील पत्रकारांसाठी नियमावली असली पाहिजे, पत्रकारांसाठी आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच सन्मान मानधन असले पाहिजे अशी मागणी केली. प्रलंबित मागण्यांसंदर्भात पत्रकारांच्या विविध संघटनांच्या वतीने सातत्याने सरकारकडे म्हणणे मांडले जाते. इतरांना न्याय मिळवून देणारा पत्रकार मात्र स्वत:च्या मागण्यांसदर्भात वारंवार शासन दरबारी हेलपाटे मारत असतो. याची शासनाने दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने सर्व पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलवून पत्रकारांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लागावे, अशी सूचना सभापती निलम गोर्‍हे यांनी केली.

नक्की वाचा : प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला; महिलांची टोळी जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here