Satyajit Tambe : संगमनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत बाजार समितीच्या एकूण कार्यपद्धतीत अधिक कार्यक्षम बदल घडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
नक्की वाचा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शेतकऱ्यांना फायदा मिळेल अशा उपाययोजना राबवा
आमदार तांबे यांनी बाजार समितीच्या आर्थिक सुविधा अधिक सक्षम करण्याची तसेच शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. बाजार समितीतील पारदर्शक व्यवहार व्यवस्था, हमाल-माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यापाऱ्यांसाठी सुलभ सुविधा तसेच शेतकऱ्यांना योग्य दरात बाजारपेठ उपलब्ध करून देणे या विषयांवर आमदार तांबे यांनी सविस्तर मुद्दे मांडले.
अवश्य वाचा : पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक
महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावा (Satyajit Tambe)
या चर्चेत बाजार समितीच्या विकासासाठी काही महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावण्यात आले असून उर्वरित विषयांवर लवकरच निर्णय होईल, असे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.