Satyajit Tambe : अकोले: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या आमदार निधीतून अकोले तालुक्यातील 9 जिल्हा परिषद शाळांना संगणक संच (Computer Set) व 10 विद्यालयांना ई-पोडियमचे नुकतेच वितरण करण्यात आले.
नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस
अनेक कार्यकर्ते होते उपस्थित
अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी नेहे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोपटराव नाईकवाडी, बाळासाहेब शेटे, आरिफ तांबोळी, रघुनाथ शेणकर, शहराध्यक्ष रामदास धुमाळ, रमेश बोडके, अनिल वैद्य, भाऊसाहेब थोरात, शाहिद फारुकी, एकनाथ सहाणे, तुषार गायकर, बाळासाहेब कांडेकर, संपत कानवडे, निखील जोर्वेकर, डॉ. रवींद्र गोर्डे, गणेश पापळ यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी शिवाजी नेहे यांनी स्वागत करून या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
ग्रामस्थ व शाळांच्यावतीने आ. तांबे यांचे आभार मानले (Satyajit Tambe)
जिल्हा परिषद शाळा वारंघुशी, पांगरी, तांभोळ, देवठाण, धामणगाव आवारी, धुमाळवाडी, पाचनई, लहित खुर्द, शासकीय आश्रमशाळा पैठण या शाळांना संगणक संच व अगस्ति विद्यालय अकोले, कळसेश्वर विद्यालय कळस, छत्रपती विद्यालय मेहेंदुरी, सर्वोदय विद्यालय राजूर, राजा हरिश्चंद्र विद्यालय शेणित, सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा, स्वामी विवेकानंद विद्यालय वीरगाव, रामदास हायस्कूल बेलापूर, शासकीय आश्रमशाळा पैठण या विद्यालयांना ई-पोडियमचे वितरण करण्यात आले. ग्रामस्थ व शाळांच्यावतीने किरण बांडे, धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ व धुमाळवाडीच्या पोलीस पाटील प्रणाली धुमाळ यांनी आमदार सत्यजीत तांबे यांचे आभार मानले.