Satyajit Tambe : संगमनेर : राज्यात बिबट्यांची (Leopard) संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला (Central Government) सादर करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी (Satyajit Tambe) केली होती.
नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?
बिबट्यांचे मानवी वस्तीवर १४ हजार ४४२ हल्ले
मात्र वन विभागामार्फत अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव अद्याप सादर झाला नसल्याने आज पुन्हा एकदा आमदार तांबेंनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व वन विभागाच्या सचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांची लगेच त्याच ठिकाणी नसबंदी करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्रशासनाकडे तातडीने पाठवण्याची मागणी केली.
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चितेचा विषय ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात बिबट्यांनी १४ हजार ४४२ हल्ले मानवी वस्तीवर केले आहेत. त्यामध्ये २० नागरिकांचा मृत्यू तर १७३ जण जखमी झाले आहेत. १४ हजार २४९ पशुधनाची हानी झाली असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रात म्हंटले आहे. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी, सामान्य माणूस तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाले असून त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण खूप आहे व बहुतांशी मुलांचा मृत्यू देखील झाले आहेत.
अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे
हिवाळी अधिवेशनामध्येही आमदार तांबेंनी केली होती मागणी (Satyajit Tambe)
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही आमदार तांबेंनी बिबट्यांची नसबंदीचा प्रस्ताव तात्काळ केंद्र शासनाला सादर करावा, अशी मागणी केली होती. मात्र वन विभागामार्फत अशा प्रकारचा कोणताही अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे आपण बिबट्यांची नसबंदीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात पाणी भरायचं असेल किंवा काही काम करायचे असेल तर त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वनविभागाने पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करणे गरजेचे असल्याचे आमदार तांबेंनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी रात्री वीजपुरवठा केला जातो, बिबट्यांचा वावर असणाऱ्या क्षेत्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला तर बिबट्यांचे हल्ले रोखता येतील. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि घरासाठी कुंपण करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.